अडीच तासांत पकडला तीन लाखांचा गुटखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:10 AM2021-06-24T04:10:12+5:302021-06-24T04:10:12+5:30
फोटो - संतोष ठाकूर २३ पी अचलपूर पोलिसांच्या ठिकठिकाणी धाडी, मध्य प्रदेशातून येतो शहरात साठा अचलपूर-परतवाडा : अचलपूर पोलिसांनी ...
फोटो - संतोष ठाकूर २३ पी
अचलपूर पोलिसांच्या ठिकठिकाणी धाडी, मध्य प्रदेशातून येतो शहरात साठा
अचलपूर-परतवाडा : अचलपूर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे शहरातील विविध ठिकाणी मंगळवारी रात्री अडीच तास छापे टाकून ३ लक्ष २० हजार रुपयांचा अवैध गुटका जप्त केला. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात या प्रतिबंधित गुटख्याचा व्यवसाय होत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.
अचलपूरचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून त्यांनी मंगळवारी रात्री ८ ते १०.३० अशा जवळपास अडीच तास शहरातील माळीपुरा, ठिकरीपुरा, झरी, बुद्धेखाँ चौक, दिलदारपुरा, विलायतपुरा असे विविध ठिकाणी धाडी टाकल्या. त्यामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित सुगंधी गुटखा व तंबाखू विक्रेत्यांवर धाड करून एकूण ३ लक्ष २० हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. मो. इरशाद मो. अजिस याच्याकडून ६८ हजार ५९० रुपये, अज्जू याच्याकडून ४० हजार रुपये, काजी रियाजोद्दीन काजी गुलाम मोईनोद्दीन याच्याकडून २६ हजार ८२६ रुपये, जगदीश शंकर पंचभैया याच्याकडून ३५ हजार रुपये, शेख शकील शेख जाफर याच्याकडून ६२ हजार ५०० रुपये व मोबीन अहमद खान मेहताब खान याच्याकडून ८७ हजार रुपये असा एकूण ३ लक्ष १९ हजार ९१६ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र बारड, उपनिरीक्षक राजेश भालेराव, हेडकॉन्स्टेबल सिद्धार्थ वानखडे, पोलीस शिपाई राऊत, काळे, खांडेकर, पुरुषोत्तम बावनेर, परवाना विशाल थोरात, विलास सोनोने, शेख मुजफ्फर, रवींद्र अंबाडकर, आकाश आमले, झारखंडे, महिला पोलीस शिपाई वैशाली कलाने, मंगला सवई यांनी केली.
बॉक्स
मध्य प्रदेशातून येते खेप
अचलपूर शहरात चांदूर बाजार व बहिरम मार्गे मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा येत असल्याचे पोलिसांच्या यापूर्वीच या धाडीत उघड झाले आहे. परतवाडा, अचलपूर या जुळ्या शहरात अनेक लहान-मोठे व्यापारी हा अवैध व्यवसाय करीत असून, शहरातील पानटपऱ्या, ग्रामीण भागासह मेळघाटातील आदिवासी पाड्यांमध्ये येथूनच हा गुटख्याचा अवैध कारभार चालतो, हे विशेष.
===Photopath===
230621\img-20210623-wa0028.jpg
===Caption===
अचलपुर पोलिसांनी पकडला तीन लाखाचा गुटका