दर्यापुरात पिसाळलेल्या श्वानाचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:11 AM2021-06-04T04:11:35+5:302021-06-04T04:11:35+5:30

दर्यापूर : गुरुवारी दुपारी पिसाळलेल्या श्वानाने येथील १३ नागरिकांना चावा घेतला. त्यांना गंभीर इजा पोहचवली. ...

Hados of a stray dog in Daryapur | दर्यापुरात पिसाळलेल्या श्वानाचा हैदोस

दर्यापुरात पिसाळलेल्या श्वानाचा हैदोस

googlenewsNext

दर्यापूर : गुरुवारी दुपारी पिसाळलेल्या श्वानाने येथील १३ नागरिकांना चावा घेतला. त्यांना गंभीर इजा पोहचवली. नगरपालिकेने तीन महिन्यांपूर्वी मोकाट श्वानांना पकडण्याची मोहीमसुद्धा राबविली होती. परंतु, पुन्हा शहरात मोठ्या प्रमाणावर मोकाट श्वान फिरताना दिसून येतात.

गांधीनगर परिसरात अशाच एका मोकाट श्वानाने तीन लहान मुलांना चावा घेतला होता. त्यातच गुरुवारी दुपारी १३ नागरिकांना पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तीन-चार तासांच्या संघर्षानंतर त्या पिसाळलेल्या श्वानाला पालिकेच्या कर्मचाऱ्यांना यश आल्याने शहरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास घेतला. पालिकेने त्वरित मोहीम राबवून मोकाट स्वानांना पकडून जंगलात सोडण्याची मागणी शहरातील नागरिक करीत आहेत.

Web Title: Hados of a stray dog in Daryapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.