जिल्ह्यात ठिकठिकाणी गारपिटीचा तडाखा

By admin | Published: March 1, 2016 12:11 AM2016-03-01T00:11:52+5:302016-03-01T00:11:52+5:30

रविवारी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीतून सावरत नाही तोच...

The hailstorm hit the district | जिल्ह्यात ठिकठिकाणी गारपिटीचा तडाखा

जिल्ह्यात ठिकठिकाणी गारपिटीचा तडाखा

Next

अमरावती/परतवाडा/चांदूरबाजार/ चिखलदरा/तिवसा/धामणगाव रेल्वे : रविवारी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीतून सावरत नाही तोच सोमवारी पुन्हा अचलपूर तालुक्यातील काही भाग व चांदूरबाजार तालुक्याला पुन्हा वादळी पाऊस व गारपिटीने झोडपून काढले.
अचलपूर तालुक्यातील मल्हारा, सालेपूर, नरसरी या गावांना सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास वादळी पाऊस बरसला. चिखलदऱ्यातही मुसळधार पाऊस बरसला. चांदूरबाजारमध्येही सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास पुन्हा गारपिटीसह पाऊस कोसळला. कुऱ्हा, कोंडवर्धा, विलायतपूर, करजगाव, खरपी या गावात सोमवारी सायंकाळी गारपीट झाली. अमरावती तालुक्यातील डवरगाव येथेही गारा पडल्यात. चिखलदरा येथे सोमवारी सायंकाळी मुसळधार पावसाची नोंद झाली होती. तिवसा तालुक्यात सायंकाळी ७.३० वाजता वादळी पाऊस व गारपिटीमुळे शिवणगाव, जावरा, शेंदोळा, शेंदोळा माहोरा व कुऱ्हा गावांत शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले.
धामणगावरेल्वे तालुक्यात गारपिटीचा तडाखा आठ गावांना बसला. यामध्ये कावलीवसाड, चिंचपुर, अंजनसिंगी, गव्हानिपानी, अशोकनगर, ढाकुलगाव, गुंजी येथे निंबाच्या आकाराची गार पडली. विद्युत तारा तुटल्याने सर्वत्र अंधाराचे सावट पसरले होते. तालुक्यात संत्रा उत्पादकांची संख्या अधिक असल्याने संत्रा बहराला गळती लागली. गारपिटीची झळ बागायती पिकांनाही बसली. तहसील प्रशासनाने तत्काळ सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

Web Title: The hailstorm hit the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.