अमरावती जिल्ह्यात गारपीट; गव्हासह फळपिकांना फटका
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: March 17, 2023 19:50 IST2023-03-17T19:49:52+5:302023-03-17T19:50:40+5:30
Amravati News अमरावती जिल्ह्यात गुरुवारी पाच तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस बरसला, शुक्रवारी धारणी तालुक्यात गारपिटीची नोंद झाली आहे.

अमरावती जिल्ह्यात गारपीट; गव्हासह फळपिकांना फटका
अमरावती : जिल्ह्यात गुरुवारी पाच तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस बरसला, शुक्रवारी धारणी तालुक्यात गारपिटीची नोंद झाली आहे.
तालुक्यातील डिजिटल व्हिलेज हरिसाल, कोठा, कोट, बोरी, नांदुरी या परिसरात शुक्रवारी सायंकाळी ५ ते ६ दरम्यान विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने गारासह हजेरी लावली. इतरत्र पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे.
काहींनी गहू, हरभरा पीक कापून ठेवले, तर अनेक शेतात पिके उभी आहेत. त्यांच्यासह आंबा, संत्रा आणि लिंबू या पिकांना धारणी तालुक्यात गारपिटीने नुकसान झाले. त्यात आता कर्मचारी संपात असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.यापूर्वी ७ मार्चलादेखील अवकाळी पावसाने जिल्ह्यातील रब्बी पिकांचे नुकसान झालेले असताना आठ दिवसांत पुन्हा काही ठिकाणी अवकाळीचा फटका बसला.
गारपिटीची शक्यता
विदर्भात १७ ते १९ मार्च दरम्यान काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, वादळ तसेच विजांच्या कडकडाटाची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे.