निम्मे शहर पाण्यापासून वंचित

By admin | Published: November 26, 2014 10:58 PM2014-11-26T22:58:41+5:302014-11-26T22:58:41+5:30

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कोणतीही पूर्व सूचना न देता मंगळवारी अचानक पाणी पुरवठा बंद ठेवला. परिणामी निम्म्या शहरवासीयांची गैरसोय झाली. भीमटेकडी येथील जलकुंभाचे व्हॉल्व्ह नादुरुस्त

Half the city is deprived of water | निम्मे शहर पाण्यापासून वंचित

निम्मे शहर पाण्यापासून वंचित

Next

व्हॉल्व्ह नादुरुस्त : यथावकाश करणार दुरूस्ती
अमरावती : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कोणतीही पूर्व सूचना न देता मंगळवारी अचानक पाणी पुरवठा बंद ठेवला. परिणामी निम्म्या शहरवासीयांची गैरसोय झाली. भीमटेकडी येथील जलकुंभाचे व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्यामुळे पाणी पुरवठा होऊ शकला नाही, ही बाब बुधवारी निदर्शनास आली आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला पाणी पुरवठा बंद ठेवण्यापूर्वी एक किंवा दोन दिवस आधी नागरिकांना सूचित करावे लागते. मात्र, कोणतीही पूर्व सूचना न देता मंगळवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला. त्यामुळे नागरिक हैराण झालेत. दैनंदिन पाणी पुरवठ्याच्या भरवशावर असणाऱ्या नागरिकांना पाण्यासाठी विहिरी, हातपंपावर जाण्याचा प्रसंग ओढावला.
तपोवन येथील जलशुद्धीकरण केंद्रातून शहरात पाणी पुरवठा केला जातो. मात्र, भीमटेकडी येथील जलकुंचा व्हॉल्व्ह गेल्या काही दिवसांपासून नादुरुस्त असल्यामुळे तो चालू-बंद करता येत नव्हता. त्यामुळे सतत पाणी सुरूच राहात होते. पाण्याचा अपव्यय थांबावा, यासाठी हे नादुरुस्त व्हॉल्व्ह दुरुस्त करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला. परंतु या व्हॉल्व्हमध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले.
लगेच तो दुरु स्त करणे शक्य नसल्यामुळे हे नादुरुस्त व्हॉल्व्ह ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहेत. पाणी पुरवठा खंडीत करता येत नसल्यामुळे येत्या काही दिवसांत या नादुरुस्त व्हॉल्व्हचे काम हाती घेण्याचा निर्णय जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे. तुर्तास पाण्यापासून कोणीही वंचित राहू नये, ही प्राधिकरणाची भूमिका आहे. या व्हॉल्व्हची दुरुस्ती करायची झाल्यास किमान दोन दिवसांचा कालावधी लागेल, असा अंदाज अधिकाऱ्यांचा आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Half the city is deprived of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.