अर्धा पावसाला आटोपला, सहा तालुके माघारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:06 AM2021-08-02T04:06:17+5:302021-08-02T04:06:17+5:30
पावसाळ्याचे जून ते सप्टेंबर हे चार महिने गृहीत धरण्यात जातात, या कालावधीत प्रत्येक तालुक्यासह जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन विभागाचा कक्ष ...
पावसाळ्याचे जून ते सप्टेंबर हे चार महिने गृहीत धरण्यात जातात, या कालावधीत प्रत्येक तालुक्यासह जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन विभागाचा कक्ष २४ तास सुरु असतो व त्यानंतर येणारा पाऊस हा परतीचा किंवा अवकाळी असे संबोधिल्या जाते. यंदा महावेध या संस्थेद्वारा मंडळनिहाय दर तीन तासांनी पावसाची नोंद घेतल्या जात आहे. यापूर्वी महसूल विभागाद्वारा रोज सकाळी आठ वाजता पावसाची नोंद घेतल्या जात असे,
जिल्ह्यात १ जून ते १ ऑगस्ट या कालावधीत ३९४.७ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असतांना प्रत्यक्षात ४६०.७ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. ही टक्केवारी अपेक्षित सरासरीच्या ११६. ७ टक्के आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनूसार सर्वाधिक १६४ टक्के पावसाची नोंद अंजनगाव सुर्जी तालुक्यात झालेली आहे. या तालुक्यात ५०७.५ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. भातकुली ४३० मिमी, नांदगाव खंडेश्वर ४७२.६ मिमी, चांदूर रेल्वे ४८२ मिमी, तिवसा ३४१मिमी, वरुड ४२८ मिमी, दर्यापूर ४७२ मिमी, व चांदूर बाजार तालुक्यात ३७९ मिमी पावसाची नोंद झालेले आहे. या आठ तालुक्यात पावसाने सरासरी पार केलेली आहे.
बॉक्स
हे तालुक्यात पावसाची सरासरी कमी
जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत सर्वात कमी पाऊस चिखलदरा तालुक्यात झाला. या तालुक्यात ६५३.५ मिमीची सरासरी अपेक्षित असतांना प्रत्यक्षात ४६४.५ मिमी पावसाची नोंद झाली. धारणी तालुक्यात ४५३.३ मिमी, अमरावती ४३९.७ मिमी, मोर्शी ३५५.३ मिमी, अचलपूर ४०१.१ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. हे सहा तालुके पावसाच्या सरासरीत माघारले आहे.