सहापटच कर आकारणी !
By Admin | Published: August 21, 2015 12:43 AM2015-08-21T00:43:49+5:302015-08-21T00:43:49+5:30
नगरसेवकांनी सभागृहात केलेला दुप्पट कर आकारणीचा ठराव फेटाळत महापालिका प्रशासनाने अतिरिक्त आणि विनापरवानगी बांधकामाच्या क्षेत्रफळानुसार वर्गवारीनिहाय ...
आयुक्तांचे आदेश : सभागृहाचा ठराव प्रशासनाला अमान्य
अमरावती : नगरसेवकांनी सभागृहात केलेला दुप्पट कर आकारणीचा ठराव फेटाळत महापालिका प्रशासनाने अतिरिक्त आणि विनापरवानगी बांधकामाच्या क्षेत्रफळानुसार वर्गवारीनिहाय सहापट (सहावर्ष) कर आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने नागरिकांना नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरु झाली असून कर आकारणीच्या मुद्दावरुन आयुक्त विरुद्ध नगरसेवक असा वाद निर्माण होण्याचे चिन्हे आहेत.
जुलै महिन्यात पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी एकमताने ठराव पारित करुन कर आकारणी ही सरसकट दोन पट (दोन वर्ष) वसूल करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा ठराव आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना मान्य नसल्याचे १७ आॅगस्ट रोजी झालेल्या सभेत त्यांनी स्पष्ट केले. सभागृहाने घेतलेला ठराव हा नागरिकांच्या हिताचा असून ते सर्वपक्षीय नगरसेवकांचे मत आहे, अशी सर्वंकष चर्चा करण्यात आली. महापौरांनी ठराव मंजूर के ला असताना तो मागे कसा घेणार? असे एकूणच पदधिकाऱ्यांनी मत नोंदविले. त्यामुळे सभागृहाने घेतलेला निर्णय हा कायम असून कर आकारणीबाबत प्रशासनाला कोणता निर्णय घ्यायचा आहे तो घऊ द्या, असे दिंगबर डहाके, अविनाश मार्डीकर, तुषार भारतीय, संजय अग्रवाल, प्रकाश बनसोड, अजय गोंडाणे, प्रवीण हरमकर, कांचन ग्रेसपुंजे, बबलू शेखावत, विलास इंगोले आदींचे म्हणणे होते.
आमसभेच्या ठरावाची आयुक्तांनी अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. नागरिकांच्या हितासाठी सदस्यांनी निर्णय घेतला. आयुक्तांना या ठरावाची अंमलबजावणी करण्यास शासनाने बंधनकारक करावे.
- बबलू शेखावत,
विरोधी पक्षनेता
नागरिकांनी सहापट कर आकारणीची रक्कम भरू नये. चालू वर्षांचे म्हणजे २०१५ या वर्षाचे कर आकारणीची रक्कम भरण्यात आली आहे. कर आकारणीबाबत मिळालेल्या नोटीस नागरिकांनी फेटाळाव्यात.
- प्रवीण हरमकर,
विरोधी पक्षनेता, महापालिका.