हलकल्लोळ, विलाप अन् संतापही!

By admin | Published: July 5, 2014 11:18 PM2014-07-05T23:18:28+5:302014-07-05T23:18:28+5:30

रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले चिमुकल्यांचे मृतदेह. जखमी अवस्थेत विव्हळणारे आप्त आणि या आप्तांची अवस्था बघून भांबावलेल्या इतर स्वजनांनी सुरू केलेला केविलवाणा आक्रोश.

Hallelujah, mourning and anger! | हलकल्लोळ, विलाप अन् संतापही!

हलकल्लोळ, विलाप अन् संतापही!

Next

बडनेऱ्यात वाहनाने चिरडले : भटकंतीच्या आयुष्यात मृत्यू करतो पाठलाग
श्यामकांत सहस्त्रभोजने - बडनेरा
रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले चिमुकल्यांचे मृतदेह. जखमी अवस्थेत विव्हळणारे आप्त आणि या आप्तांची अवस्था बघून भांबावलेल्या इतर स्वजनांनी सुरू केलेला केविलवाणा आक्रोश. असे हृदयाला पीळ पाडणारे विदारक चित्र शनिवारी सकाळी ७.३० च्या दरम्यान बडनेरा महापालिका कार्यालयानजीक दिसून आले. बेधुंद झायलो वाहनाने चिरडल्यानंतर मदतीसाठी चहुकडे धावणारे पारधी समुदायाचे नागरिक आणि महिलांचा हलकल्लोळ पाहून प्रत्यक्षदर्शींच्या अंगावर शहारे उभे राहिले. दरम्यान, घटनेची माहिती बडनेरा पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस ताफा पोहोचला. लगेच १०८ क्रमांकाच्या अ‍ॅम्ब्युलन्सला देखील पाचारण करण्यात आले. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी इर्विनमध्ये दाखल केले. जखमींमध्ये लहान मुले, मुली, महिलांचा समावेश आहे.
पारधी बांधवांची वाहनचालकाला मारहाण
निद्रिस्त अवस्थेतील पारधी समुदायाला भरधाव वाहनाने चिरडून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला झायलो चालक अमर राठोड व त्याचा साथीदार विनोद दुबे यांना पारधी बांधवांनी बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे, तर वाहनाची तोडफोडही केली. यामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टळला.
घटनास्थळी पोहोचले पोलीस आयुक्त
घटनास्थळी पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कडू, उपनिरीक्षक पी.पी. घावडे उपस्थित होते. यावेळी पोलीस आयुक्तांनी अपघात स्थळाचे अवलोकन करून कारणांची मीमांसा केली.

Web Title: Hallelujah, mourning and anger!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.