खात्यातील पैसे सांभाळा; ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:14 AM2021-09-23T04:14:07+5:302021-09-23T04:14:07+5:30
असाईनमेंट पान १ अमरावती : अलीकडेच जाहीर केलेल्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो अर्थात एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, सन २०२० मध्ये ऑनलाईन ...
असाईनमेंट
पान १
अमरावती : अलीकडेच जाहीर केलेल्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो अर्थात एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, सन २०२० मध्ये ऑनलाईन फसवणुकींच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अमरावती शहर व ग्रामीणमध्येदेखील ऑनलाईन फसवणुकीच्या शेकडो घटना घडल्या आहेत.
कोरोनामुळे डिजिटल व्यवहारात मोठी वाढत होत असून, सायबर ठगांनी ऑनलाईन लूट सुरू केली आहे. डेबिट, क्रेडिट कार्डांची माहिती चोरून त्याचे क्लोनिंग करणे, बँक खातेदारांशी संपर्क साधून त्यांना फसवून बँक खात्याची गोपनीय माहिती विचारून पैसे काढण्याच्या घटना वाढल्या आहेत. डेबिट, क्रेडिट कार्डधारकांच्या वापराविषयी अनभिज्ञ असण्याचा फायदा घेऊन त्यांना सायबर चोरटे सहज फसवू लागले आहेत. बँकेतून अधिकारी बोलत असल्याचे सांगून कार्डची माहिती चोरांकडून विचारली जाते. कार्ड बंद पडण्याची भीती दाखवून नागरिकांकडून कार्डची सर्व माहिती विचारली जाते. काही वेळातच कार्डधारकांचे बँक खाते रिकामे झाल्याचा मेसेज आल्यानंतर फसवणूक झाल्याचे त्यांना समजते. तोपर्यंत सायबर चोरट्यांनी सर्व पैसे काढून घेतलेले असतात.
////////////
सायबर क्राईम वाढतोय
२०१९ : २२
२०२० : ८६
२०२१ : २५
/////////
२०२० मधील सायबर क्राईम
आयटी ॲक्ट : १४
महिलांचा छळ : ४७
डेटा चोरी : ३
फसवणूक ४
क्रेडिट डेबिट कार्ड ३२
///////////
अनेक प्रकरणात आरोपपत्र दाखल
सायबर गुन्हेगारांचा वाढता उच्छाद व दाखल गुन्ह्यांची आकडेवारी पाहता अमरावती शहर आयुक्तालयात सायबर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. ऑनलाईन फ्रॉड येथे नोंदविले जातात. पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र सहारे यांच्या नेतृत्वात सायबर पोलीस या घटनांचा तपास करते. अनेक प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.