विद्यार्थ्यांची प्रकरणे जलदगतीने हाताळा

By admin | Published: June 5, 2014 11:42 PM2014-06-05T23:42:44+5:302014-06-05T23:42:44+5:30

जात प्रमाणपत्रे, नॉन क्रिमिलेअर व तत्सम प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी दाखल प्रकरणे तीन ते चार दिवसांत निकाली काढा, असे आदेश उपविभागीय अधिकार्‍यांनी तालुक्यातील सेतू केंद्रांना दिले.

Handle student cases faster | विद्यार्थ्यांची प्रकरणे जलदगतीने हाताळा

विद्यार्थ्यांची प्रकरणे जलदगतीने हाताळा

Next

अंजनगाव सुर्जी : जात प्रमाणपत्रे, नॉन क्रिमिलेअर व तत्सम प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी दाखल प्रकरणे तीन ते चार दिवसांत निकाली काढा, असे आदेश उपविभागीय अधिकार्‍यांनी तालुक्यातील सेतू केंद्रांना दिले.
बारावीचा निकाल लागला असून दहावीचाही निकाल लवकरच जाहीर होणार आहे. निकाल लागताच पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची तहसील कार्यालयात झुंबड सुरू होते. प्रवेशासाठी जात प्रमाणपत्रे, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी सेतू केंद्रांवर विद्यार्थ्यांची गर्दी उसळणार आहे. त्यामुळे अशी प्रकरणे सेतू केंद्र धारकांनी व अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी कोणतीही दिरंगाई न करता तातडीने हाताळावीत, अशी सूचना उपविभागीय अधिकारी सोहम वाचाळ यांनी सेतू केंद्रधारकांना दिली. यासाठी तहसीलदार विजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सेतू केंद्र धारकांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी वाचाळ पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांची प्रकरणे हाताळण्यात दिरंगाई झाल्यास पुन्हा नव्याने प्रकरणे सादर करावी. परंतु कोणत्याही प्रकरणास चार दिवसांपेक्षा अधिक उशीर होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सेतू केंद्रांच्या कार्यप्रणालीत पादर्शकता बाळगण्यात  यावी.
सर्व सेतू केंद्रांनी आपल्या कामाच्या स्वरूपाचे भावफलक केंद्राच्या दर्शनी भागात लावावेत. कागदपत्रांची मांडणी व्यवस्थित ठेवावी. जात प्रमाणपत्रासाठी आधी मुलाचे, नंतर वडिलाचे, शेवटी आजोबांचे व त्यानंतर महसुली पुरावे जोडण्यात यावेत. सर्व प्रकरणांत नियमानुसारच शुल्क आकारणी करावी.
केंद्रात आलेल्या ग्राहकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्याच्या सूचनाही उपविभागीय अधिकार्‍यांनी दिल्या आहेत.
यावेळी सेतू केंद्र धारकांच्यावतीनेही अडचणी मांडण्यात आल्या. केंद्रावर वाढलेल्या गर्दीमुळे ओळखपत्र आदी कागदपत्रांची शहानिशा करणे, हे कठीण काम ठरते. अनेक ग्राहक स्वत:चे ओळखपत्र न आणता प्रतिज्ञापत्र देण्याचा हट्ट करतात. त्यामुळे ओळखीच्या व्यक्तिंना असे प्रमाणपत्र द्यावे लागते. वेगवेगळ्या सेतू केंद्रात वेगवेगळे शुल्क आकारण्यात येत असल्याचा आरोप  यावेळी सेतू केंद्र संचालकांकडून नाकारण्यात आला. यावर्षीपासून विद्यार्थ्यांंना वेळेत प्रमाणपत्र मिळतील
 

Web Title: Handle student cases faster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.