बसस्थानक, श्याम चौकासह १२ ठिकाणी सांभाळा दुचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:14 AM2021-09-23T04:14:55+5:302021-09-23T04:14:55+5:30
प्रदीप भाकरे अमरावती : शहरासह जिल्ह्यात चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असले तरी काही दिवसांमध्ये पोलीस आयुक्तालय हद्दीत विशेषत: वाहनचोरीच्या ...
प्रदीप भाकरे
अमरावती : शहरासह जिल्ह्यात चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असले तरी काही दिवसांमध्ये पोलीस आयुक्तालय हद्दीत विशेषत: वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा आलेख वाढू लागला आहे. २० दिवसांमध्ये विविध पोलीस ठाण्यांत वाहनचोरीच्या २० पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद झाल्याने वाहनमालक धास्तावले आहेत. त्यातही दुचाकी चोरीचे प्रमाण अधिक आहे. गंभीर बाब म्हणजे अनेकदा चोरीच्या वाहनांचा वापर गुन्हे करण्यासाठी होत असल्याचे दिसून येते.
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत रस्त्यावर उभी असलेली वाहने अवघ्या काही मिनिटांत चोरीला जात आहे. अनेकदा चोरीच्या गाड्यांचा वापर बेकायदा कामासाठी तसेच गुन्हे करण्यासाठी होत असल्याचे दिसून येते. विशेष करून सोनसाखळी चोरीसाठी या दुचाकी वापरल्या जात असल्याची बाब पोलिसांच्या तपासात यापूर्वी निष्पन्न झाली आहे.
//////////////
आकडे काय सांगतात
आठ महिन्यात शहरातील वाहन चोरी : २२०
सायंकाळी सहा ते सकाळी सहा या वेळेत झालेल्या चोरी : ११८
सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत झालेल्या चोरी : १०२
//////////////////
या भागात सर्वाधिक धोका
बसस्टॅन्ड : येथील मध्यवर्ती बसस्थानकात लावलेली दुचाकी अजिबात सुरक्षित नाही. येथून अनेकदा वाहने चोरीला जातात. पाहुुण्यांना सोडायला आलेल्यांनाही तो फटका बसतो. त्यामुळे त्यांना पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागते.
///////////