शिवकुमारला फाशी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:13 AM2021-03-27T04:13:36+5:302021-03-27T04:13:36+5:30
अमरावती : मुलीला त्रास देणाऱ्या शिवकुमारला फाशी द्या, अन्यथा मला फाशी द्या, असा आक्रोश मृत दीपाली चव्हाण यांच्या आईने ...
अमरावती : मुलीला त्रास देणाऱ्या शिवकुमारला फाशी द्या, अन्यथा मला फाशी द्या, असा आक्रोश मृत दीपाली चव्हाण यांच्या आईने केला. त्यांना इर्विन रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्रात दुपारी नातेवाईकांनी आणले. यावेळी त्या मोठी मुलगी वैशालीला पकडून ओक्साबोक्सी रडू लागल्या. त्यांनी दीपालीचा मृतदेह बघताच हंबरडा फोडला. आईची अशी अवस्था बघून नातेवाईकांनाही आश्रृ आवरता आले नाही. समाजात, घरात सर्वात जास्त शिकलेली व उच्च पदावर असलेली मुलगी अचानक सोडून गेल्याचे दुख त्यांच्या मनाशी होते. आता माझी मुलगी परत येणार नाही. मात्र, ज्या अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून मुलीने टोकाचे पाऊल उचलले त्या अधिकाऱ्यांची पोलिसांनी जमानत होऊ देऊ नये, त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अन्यथा मला फाशी द्यावी, असा आक्रोश दीपालीच्या वृद्ध आईने केला. मोठी मुलगी वैशाली कुलदीप पवार(सातारा) व आत्या सुनंदा चव्हाण (पुणे) यांच्याही आश्रृंचा बांध फुटला.
बॉक्स
पाच वर्षांपूर्वी वडील व भावाचाही मृत्यू
दीपाली अभ्यासात हुशार होती. घरात सर्वात शिक्षित अल्यामुळे अधिकारी होण्याचे स्वप्ने तिने पूर्ण केले. मात्र, अधिकारी झाल्यानंतर अचानक पाच वर्षांपूर्वी वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर सहा महिऱ्यांनी कर्करोगाने इंजिनिअरिगला शेवटच्या वर्षाला शिकत असलेल्या धाकट्या भावाचाही मृत्यू झाला. त्यामुळे आई दीपाली यांच्याकडे हरीसाल येथे राहत होत्या. दीड वर्षांपूर्वी दीपालीचे ट्रेझरी कार्यालयात कोषागार म्हणून कार्यरत असलेल्या राजेश मोहिते यांच्याशी लग्न झाले. मात्र, आता दीपालीने शिवकुमारच्या जाचाला कंटाळून असे पाऊल उचलल्याने नातेवाईकांवर हा मोठा आघात आहे. आश्रृंना वाट मोकडी करीत दीपाली यांची मोठी बहिणी वैशाली यांनी ही प्रतिक्रिया दिली.
बॉक्स
दीपाली शांत व बोल्ड स्वभावाची होती
दीपालीचे एम.एस्सी. केले होते. त्यानंतर स्पर्धा परीक्षेतून जिद्द व चिकाटीने वनविभागात अधिकारी म्हणून शासकीय सेवेत रुजू झाली. ती जेवढी शांत होती तेवढीच बोल्ड स्वाभावाची होती. अशी आठवणही यावेळी वैशालीने करून दिली.
बॉक्स:
गर्भवती असतानाही दिली जोखमीची कामे
मे महिन्यात लॉकडाऊनमध्ये मी बहिण दिपालीकडे काही दिवस राहली. तिचे वरीष्ठ अधिकारी शिवकुमार हे तिला नेहमीच त्रास द्यायचे तातडीने कॅम्पला पाठवून तेथून सेल्फी पाठविण्याचे आदेश देत होते. ती गर्भवती असतानाही तिला सतत जोखमीची कामे दिल्या जात होती त्यादरम्यान तिला धावपड करण्यास भाग पाडल्यामुळे तिला गर्भपात करावा लागला. त्यामुळे तिच्या पोटातील जीवाचाही बळी गेला. याला सुद्धा कारणीभुत शिवकुमार हा असल्याचा आरोप यावेळी मृताची बहीण वैशाली पवार यांनी केला. तसेच शिवकुमारला पाठीशी घालणारे वरीष्ठ अधिकारी रेड्डी यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी असे त्या म्हणाल्या. रेड्डी यांनी या प्रकरणात लक्ष घातले असते तर दिपालीचे प्राण वाचले असते त्यामुळे ते सुद्धा दोषी आहेत असा उल्लेखही त्यांनी केला.
कोट
शिवकुमारला अटक झाली. मात्र या प्रकरणात रेड्डी यांनी त्याला पाठीशी घालण्याचे कामे केले. त्यामुळे पोलिसांनी रेड्डी यांच्यावर तातडीने गुन्हा नोंदवून अटक करावी अशी आमची मागणी आहे.
रजनी पवार
कोट
समाजभुषण असलेल्या लेखीचा अशा प्रकारे मृत्यू झाला हा समाजाला वेदना देणारी घटना आहे. जो पर्यंत रेड्डी यांच्यावर गुन्हा नोंदवून अटक होत नाही. तो पर्यंत आम्ही मृतदेहाचे शवविच्छेदन होवू देणार नाही. आमची संघटना मृताच्या परीवारासोबत आहे.
राजू सोळुंके
महाराष्ट्र राज्य बेलदार भटका समाज
कोट
शिवकुमार यांना अटक केली आहे. नातेवाईकांनी या प्रकरणी तक्रार द्यावी, बयाण नोंदविल्यानंतरच या प्रकरणात कुणाकुणाचा सहभाग आहे. याची चौकशीअंती कायदेशिर कारवाई करण्यात येईल.
हरीबालाजी एन.
जिल्हा पोलीस अधिक्षक़ अमरावती