लोंबकळलेल्या जिवंत विद्युत तारा उठल्या शेतकऱ्यांच्या जिवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:10 AM2021-06-05T04:10:33+5:302021-06-05T04:10:33+5:30
पान २ चे लिड जीव धोक्यात घालून नांगर-वखरणी : महावितरण कंपनी निद्रिस्त नरेंद्र जावरे परतवाडा : महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे ...
पान २ चे लिड
जीव धोक्यात घालून नांगर-वखरणी : महावितरण कंपनी निद्रिस्त
नरेंद्र जावरे
परतवाडा : महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. शिवारात लोंबकळणाऱ्या जिवंत विद्युत तारा अपघाताला आमंत्रण देणाऱ्या ठरल्या असताना अभियंत्यांचे दुर्लक्ष बळीराजामध्ये संताप व्यक्त करणारे ठरले आहे.
परतवाडा-अमरावती मार्गावरील अचलपूर तालुक्यात येणाऱ्या जवर्डी शिवारात गट नंबर १०९ परिसरात बबनराव नत्थूजी काळे, प्रभाकर काळे, प्रतापसिंह ठाकूर, किशोर काळे, दिवाकर काळे, दीपक काळे, मनीष आवारे इतरही शेतकऱ्यांच्या शेतातून चार महिन्यांपासून अवकाळी पाऊस व वादळ वाऱ्यामुळे शेतातील कृषिपंपांना वीजपुरवठा करणारे खांब वाकले. जिवंत विद्युत तारा लोंबकळल्या आहेत.
बॉक्स
पेरणीपूर्व मशागतीसाठी जीव धोक्यात
चार महिन्यांपासून या जिवंत विद्युत तारा लोंबकळल्या आहेत. महावितरणला यासंदर्भात वारंवार परिसरातील शेतकऱ्यांनी निवेदन दिले. मात्र, कुठलीच दुरुस्ती करण्यात आली नाही. पावसाळ्याचे दिवस पाहता, शेतकरी पेरणीपूर्व मशागतीसाठी राबत आहे. अशात जिवंत विद्युत तारा अंगावर पडल्यास जीवितहानी होण्याची भीती बळीराजांनी व्यक्त केली आहे. अनुचित घटना घडल्यास महावितरण कंपनी जबाबदार राहील, असा इशारा बाजार समितीचे संचालक शिवबा काळे यांनी दिला आहे.
कोट
चार महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळामुळे जवर्डी व परिसरातील अनेक शेतात खांब वाकले. विद्युत तारा जमिनीवर लोंबकळल्या. महावितरण कंपनीला सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
शिवबा काळे, संचालक, बाजार समिती, अचलपूर
कोट
यासंदर्भात कारवाई सुरू आहे. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे काम थांबले आहे. लवकरात लवकर दुरुस्त केली जाईल.
- मनोज जिभकाटे, कनिष्ठ अभियंता, तोंडगाव उपकेंद्र