राजस्थान सरकारचे अमरावती जिल्ह्यातील अचलपुरात हनुमान मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 04:12 PM2018-03-30T16:12:19+5:302018-03-30T16:13:56+5:30

राजस्थानच्या रजपूत इतिहासात मानाचे स्थान असणारे राजा मानसिंह यांनी स्थापन केलेले हनुमानाचे मंदिर अचलपूर येथे अस्तित्वात आहे. येथील हनुमान भक्तांच्या मनोकामना पूर्ण करीत असल्याची आख्यायिका आहे.

Hanuman Temple at Achalpur in Amravati district of Rajasthan state | राजस्थान सरकारचे अमरावती जिल्ह्यातील अचलपुरात हनुमान मंदिर

राजस्थान सरकारचे अमरावती जिल्ह्यातील अचलपुरात हनुमान मंदिर

googlenewsNext
ठळक मुद्देभाविकांचे श्रद्धास्थानराजा मानसिंहांच्या काळात झाली स्थापना

संतोष ठाकूर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: राजस्थानच्या रजपूत इतिहासात मानाचे स्थान असणारे राजा मानसिंह यांनी स्थापन केलेले हनुमानाचे मंदिर अचलपूर येथे अस्तित्वात आहे. येथील हनुमान भक्तांच्या मनोकामना पूर्ण करीत असल्याची आख्यायिका आहे. विशेष म्हणजे, राजस्थान शासनाकडून पुजाऱ्याचे मानधन तसेच मंदिरासाठी निधी देण्यात येतो.
स्थानिक सुलतानपुऱ्यातील निजामपूर रोडवर सापन नदीच्या काठावर या मंदिराची निर्मिती राजा मानसिंह यांनी केली होती. या हनुमानाला ‘जयसिंगपुरावाले बालाजी’ म्हणून ओळखले जाते. दूरदूरचे श्रद्धाळू येथे दर्शनासाठी येतात. पुजारी सुरेशसिंह ठाकूर यांचे मानधन राजस्थान सरकारकडून देण्यात येते.
अचलपुरात राजा मानसिंहांची ४१२ एकर जमीन होती. त्यांच्या मृत्यूनंतर राजस्थान शासनाने सर्व जमीन आपल्या ताब्यात घेतली.  शासनाने नंतर ती सीलिंग कायद्यांतर्गत माजी सैनिकांना प्रदान केली. याच जमिनीला लागून असलेले दोन भूखंड आजही राजस्थान शासनाच्या मालकीचे आहेत. त्यानुसार हे मंदिरसुद्धा त्यांच्या ताब्यात आहे. राजस्थान सरकारकडून मंदिराची देखरेख तसेच वर्षभर लागणाऱ्या सामग्रीसाठी वार्षिक निधी देण्यात येतो.

Web Title: Hanuman Temple at Achalpur in Amravati district of Rajasthan state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.