अहवाल सादरीकरणात अमरावतीचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक हनुमंत हेडे राज्यात सर्वोत्तम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 03:46 PM2019-05-14T15:46:54+5:302019-05-14T15:47:25+5:30
देशाच्या इतर राज्यातील पर्यटन विकासाचा अभ्यास करून त्याचा अहवाल सादरीकरणात अमरावतीच्या राज्य पर्यटन विकास महामंडळाचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक हनुमंत कृ. हेडे राज्यात सर्वोत्तम ठरले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: देशाच्या इतर राज्यातील पर्यटन विकासाचा अभ्यास करून त्याचा अहवाल सादरीकरणात अमरावतीच्या राज्य पर्यटन विकास महामंडळाचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक हनुमंत कृ. हेडे राज्यात सर्वोत्तम ठरले आहेत. एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी ही घोषणा केली.
इतर राज्यात पर्यटकांना दिल्या जात असलेल्या सेवा - सुविधा, त्यांचे धोरण, पर्यटन स्थळांसह संपूर्ण बाबींची प्रसिध्दी व पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या विविध योजनांचा यात समावेश होता. तसेच त्या-त्या राज्यातील पर्यटन विकास महामंडळांच्या निवास व्यवस्थेत झालेला बदल, त्यामुळे वाढलेले उत्पन्न व सेवांचा विस्तार आदींची पाहणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश राज्यातील सर्व प्रादेशिक अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार हनुमंत हेडे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक, अमरावती यांच्यावर मध्यप्रदेशातील पर्यटन विकासाचा अभ्यासाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. हा दौरा पुर्ण करून एमटीडीसीच्या मुंबई मुख्यालयात झालेल्या बैठकीत हा अहवाल सादर केला. या अहवालात मध्य प्रदेश पर्यटन विकास महामंडळ आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महमंडळ यांचे तुलनात्मकदृष्ट्या विश्लेषण करून दिल्याने हेडे यांचा अहवाल सर्वोत्कृष्ठ असल्याची घोषणा काळे यांनी केली. या अभ्यास दौºयाचे फलित म्हणून हेडे यांच्या सेवा पुस्तिकेत त्याची नोंद घेण्यासह त्यांना पुरस्कारही जाहीर झाला आहे. त्यांच्या अहवालानुसार धोरात्मक निर्णय घेतल्यास निश्चित पर्यटन विकास महामंडळस चागली दिशा मिळेल. हेडे दिनांक ६ आॅक्टोबर २०१८ला अमरावती प्रादेशिक कार्यालयात वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थाक या पदावर रुजू झाले आहेत.