हापूसचा गोडवा महागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:11 AM2021-04-13T04:11:59+5:302021-04-13T04:11:59+5:30
अमरावती : रत्नागिरी येथील हापूस आंबा बाजारपेठेत दाखल झाला आहे. मात्र, हल्ली हापूस महाग असल्याने सामान्यांना खरेदी करणे कठीण ...
अमरावती : रत्नागिरी येथील हापूस आंबा बाजारपेठेत दाखल झाला आहे. मात्र, हल्ली हापूस महाग असल्याने सामान्यांना खरेदी करणे कठीण झाले आहे. ८०० ते १२०० रुपये प्रतिडझन हापूस आंबा विकला जात आहे.
------------------------
इतवारा बाजारात गर्दी वाढली
अमरावती : येथील इतवारा बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी उसळत आहे. या गर्दीमुळे जणू कोरोना नाहीच, असे चित्र अनुभवास येत आहे. भाजीबाजारात सर्व काही खुले असल्याचे वास्तव आहे. कोरोना नियमांना बगल देत व्यवसाय सुरू आहे.
---------------
चित्रा चौक ते इतवारा बाजार वाहतूक काेंडी (फोटो आहे)
अमरावती : येथील चित्रा चौक ते ईतवारा बाजार या दरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. रस्त्यालगत हातगाड्यांमुळे यात भर घातली जात आहे. कामांमुळे सतत वाहतूक विस्कळीत होत असल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
----------
डॉ. आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करा
अमरावती : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अतिशय साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने करण्यात आले आहे. कोरोना संसर्गाचा प्रकोप वाढत असून, आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. त्यामुळे आंबेडकर अनुयायांनी कायद्याचे पालन करावे, असे आवाहन प्रकाश बोरकर यांनी केले आहे.