सोशल मीडियावर महिलांचा छळ; ‘सायबर’कडे तक्रारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:13 AM2021-07-29T04:13:18+5:302021-07-29T04:13:18+5:30

असाईनमेंट अमरावती : आतापर्यंत महिला, मुलींच्या छेडखाणीचे प्रकार आपण रस्त्यावर पाहत होतो. मात्र, आता महिला, तरुणींचा सोशल ...

Harassment of women on social media; Complaints to Cyber! | सोशल मीडियावर महिलांचा छळ; ‘सायबर’कडे तक्रारी!

सोशल मीडियावर महिलांचा छळ; ‘सायबर’कडे तक्रारी!

Next

असाईनमेंट

अमरावती : आतापर्यंत महिला, मुलींच्या छेडखाणीचे प्रकार आपण रस्त्यावर पाहत होतो. मात्र, आता महिला, तरुणींचा सोशल मीडियाच्या माध्यमातूनही छळ होत असल्याचे प्रकार वाढले आहे. अनेक जण बनावट अकाउंट तयार करून मुलींची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या तक्रारी सायबर सेलकडे प्राप्त झाल्या आहे.

पोलिसांनी अशा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्यांना पोलिसी खाक्या दाखवला आहे. फेसबुकवर बनावट अकाउंट बनविणे, सोशल मीडिया साइटवर महिला, मुलींबाबत बदनामीकारक मजकूर प्रकाशित करणे, अश्लील संवाद साधणे, आक्षेपार्ह फोटो मॉर्फिंग करणे आदी प्रकार सध्या वाढले असून सोशल मीडियावरही महिलांचा छळ सुरूच आहे. तीन वर्षांत अनेक तक्रारी सायबर सेलकडे दाखल झाल्याची माहिती असून पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी दिली.

सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर यांच्या मार्गदर्शनात सायबर सेलने आरोपींच्या मुसक्या आवळून महिला व मुलींना दिलासा देण्याचे काम केले आहे. अशा घटना घडत असल्याचे दिसून येत असल्याने अधिक सावध राहण्याची गरज आहे.

कोट

नुकत्याच घेतलेल्या वेबिनारमध्ये असे लक्षात आले, की कोरोना काळात सोशल मीडियावर महिलांच्या छळाच्या तक्रारी वाढल्या आहेत. यंत्रणा अधिक सक्षम करायला हव्या. स्वयंसेवी संस्थांनी

- सुरेखा ठाकरे, महिला नेत्या.

तक्रार न करणाऱ्यांची संख्या अधिक

अनेक युवती बदनामी होण्याच्या भीतीने पोलिसात तक्रार करण्यास जात नाही. घरचे काय म्हणतील, समाज काय म्हणेल, या भीतीने अनेक जण पोलिसांची मदत न घेण्याचाच विचार करतात. मात्र, असा प्रकार झाल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क करावा. तक्रारकर्त्याचे नावही गुप्त ठेवण्यात येत असल्याने घाबरण्याची काहीही गरज नसते. मात्र, तरीदेखील तक्रार न करणाऱ्यांची संख्या जास्त असते.

येथे करा तक्रार...

महिला व मुलींना अशा प्रकारचा त्रास झाल्यास सर्वात आधी फेसबुकवरून आपले अकाउंट प्रायव्हेट करा. ते बंद करून थेट नजीकचे पोलीस ठाणे गाठा.

सोशल मीडियावर आलेल्या कुठल्याही मेसेजला रिप्लाय देऊ नका. सायबर सेल गाठून ही माहिती तेथील पोलिसांना द्या.

पोलिसांच्या वेबपोर्टलवरून ऑनलाइनदेखील तुम्ही तक्रार करू शकता. वेळ न गमावता पोलिसांना याची माहिती द्या.

सोशल मीडियाकडे २०२१ मध्ये आलेल्या तक्रारी

फेसबुक : २१

इन्टाग्राम : ७

व्हॉट्सॲप : ११

अशा प्रकारचा होतो छळ

अश्लील मेसेज पाठविणे.

बनावट अकाउंट

बदनामीकारक मजकूर, पोस्ट

आक्षेपार्ह फोटो

सोशल मीडियावरून पाठलाग करणे

वारंवार व्हिडीओ कॉल करणे

Web Title: Harassment of women on social media; Complaints to Cyber!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.