कोट्यवधींची फसवणूक करणारा हरीश दीपाळे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 10:36 PM2019-06-30T22:36:19+5:302019-06-30T22:36:31+5:30

भिसीच्या माध्यमातून येथील व्यावसायिक व सर्वसामान्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या हरीश दीपाळेच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याला अमरावतीच्या मोतीनगर भागातून शनिवारी जेरबंद करण्यात आले. तो सहा महिन्यांपासून पसार होता. आता तक्रारकर्त्यांचा ओघ वाढण्याचे संकेत आहेत.

Harish Deepela Gajaad, the multi-billionaire cheat | कोट्यवधींची फसवणूक करणारा हरीश दीपाळे गजाआड

कोट्यवधींची फसवणूक करणारा हरीश दीपाळे गजाआड

Next
ठळक मुद्देचांदुरबाजार पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : भिसीच्या माध्यमातून येथील व्यावसायिक व सर्वसामान्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या हरीश दीपाळेच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याला अमरावतीच्या मोतीनगर भागातून शनिवारी जेरबंद करण्यात आले. तो सहा महिन्यांपासून पसार होता. आता तक्रारकर्त्यांचा ओघ वाढण्याचे संकेत आहेत.
दैनंदिन ठेव व भिसीच्या माध्यमातून लोकांचा विश्वास संपादन करून हरीश देवराव दीपाळे याने डिसेंबर २०१८ पर्यंत अनेक नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक केली. पैसे परत देण्याचे आश्वासन देऊन कुटुंबासह गावातून पसार झाला. दीपाळे याने आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार काही नागरिकांसह स्थानिक भोजनालयाचे संचालक अमोल चौधरी यांनी आवश्यक पुराव्यांसह तक्रार नोंदविली. त्या तक्रारीनुसार, पोलिसांनी मुख्य आरोपी हरीश दीपाळे, त्याचा भाऊ जगदीश दीपाळे व पुतण्या अमोल दीपाळे यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ४२०, ४०६, ३६ अन्वये गुन्हा दाखल केला. मात्र, गुन्हा दाखल होताच जगदीश व अमोल दीपाळे यांनी अटकपूर्व जामीन मिळवला. हरीश हासुद्धा अटकपूर्व जामीन मिळविण्याच्या तयारीत होता. मात्र, गुप्त माहितीच्या आधारावर चांदूरबाजार पोलिसांनी सापळा रचून हरीशला भूषण बगळे यांच्या मोतीनगर स्थित घरातून अटक केली. ही कारवाई ठाणेदार उदयसिंग साळुंखे यांच्या मार्गदर्शनात एएसआय शरद भस्मे, जमादार सचिन, पंकज फाटे, शुभांगी काळे यांनी केली. यावेळी फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलीस ठाण्यात एकच गर्दी केली होती. आरोपी हरीश दीपाळेविरुद्ध कठोर कारवाईची मागणी लावून धरली.

या प्रकरणात हरीश दीपाळे याला अटक करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान तथ्य समोर येईल. तथापि, फसवणूक झालेल्या नागरिकांनी समोर येऊन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी.
- उदयसिंग साळुंखे,
ठाणेदार, चांदूरबाजार

Web Title: Harish Deepela Gajaad, the multi-billionaire cheat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.