हरदोलीवासी पं.स.वर पायी गेले चालत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 01:02 AM2018-01-26T01:02:39+5:302018-01-26T01:03:20+5:30
सरपंचाने ग्रामसभा होऊ न दिल्याची तक्रार देण्यासाठी हरदोली-पोहरा ग्रामपंचायतीचे ५०० नागरिक आठ किलोमीटर पायी चालत गुरुवारी पंचायत समितीवर धडकले. त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
पंकज लायदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : सरपंचाने ग्रामसभा होऊ न दिल्याची तक्रार देण्यासाठी हरदोली-पोहरा ग्रामपंचायतीचे ५०० नागरिक आठ किलोमीटर पायी चालत गुरुवारी पंचायत समितीवर धडकले. त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
हरदोली ग्रामपंचायतीची आमसभा गुरुवारी आयोजित केली होती. दोन्ही गावांतील नागरिक गुरुवारी १० वाजता आमसभेला उपस्थित झाले. दरम्यान, सरपंचाने ग्रामस्थांना कोºया रजिस्टरवर स्वाक्षरी करण्यास सांगितले. त्यावर ग्रामस्थांनी आक्षेप घेतला. सरपंचाने 'पंचायत राज आहे. मी म्हणेन तसे करा, नाही तर ग्रामसभा होऊ देणार नाही. तुमच्याकडून जे होईल ते करा' असे म्हणत ग्रामसभा तहकूब केली. दोन दिवसांपूर्वीच गावात सुरू असलेले रोहयोचे कामसुद्धा सरपंचाने बंद केले. त्यामुळे नागरिक बेरोजगार झालेत. याबाबत आक्रोश व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी आठ किलोमीटर पायी चालत पंचायत समिती गाठली.