तोतया तृतीयपंथीयांना चोपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:09 PM2019-01-29T23:09:14+5:302019-01-29T23:09:44+5:30

नागरिकांच्या घरात शिरून पैशांची मागणी करणाऱ्या तोतयाला तृतीयपंथीयांनी चोप देत गाडगेनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. गाडगेनगर पोलिसांनी विलास जयचंद सावंत, गजानन मुंगुरकर आणि मोहन जगन शिंदे (तिघेही रा. मोदीपूर, जळगाव जामोद, जि. बुलडाणा) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला.

The hatred chased the third | तोतया तृतीयपंथीयांना चोपले

तोतया तृतीयपंथीयांना चोपले

Next
ठळक मुद्देप्रतिबंधात्मक कारवाई : रामपुरी कॅम्प परिसरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नागरिकांच्या घरात शिरून पैशांची मागणी करणाऱ्या तोतयाला तृतीयपंथीयांनी चोप देत गाडगेनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. गाडगेनगर पोलिसांनी विलास जयचंद सावंत, गजानन मुंगुरकर आणि मोहन जगन शिंदे (तिघेही रा. मोदीपूर, जळगाव जामोद, जि. बुलडाणा) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला.
रामपुरी कॅम्प परिसरात हे तीन तोतया तृतीयपंथीयांच्या वेशभूषेत नागरिकांच्या घरात शिरून पैशांची मागणी करीत होते. त्यांचा त्रास जाणवल्यानंतर तेथील नागरिकांनी तृतीयपंथीय आम्रपाली (रा. बडनेरा) यांना त्यांची माहिती दिली. त्यानंतर आम्रपाली व त्यांचे सहकाºयांनी रामपुरी कॅम्प परिसर गाठून तोतया तृतीयपंथीयांना जाब विचारला. यावेळी हे तिन्ही तोतया मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याचे आढळून आले. त्यांना आम्रपाली व त्यांच्या सहकाºयांनी चोप देत गाडगेनगर ठाण्यात नेले. त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासंदर्भात पोलिसांना तक्रार दिली. यावेळी नागरिकांचा प्रचंड समुदाय परिसरात गोळा झाला होता. पोलिसांनी तिन्ही तोतयांना ताब्यात घेऊन, त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली. या घटनेमुळे रामपुरी कॅम्प परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.
ते निघाले साडी, चोळी घातलेले पुरुष
रामपुरी कॅम्प परिसरातील नागरिकांच्या घरात शिरलेल्या तोतया तृतीयपंथींनी साडी-चोळी नेसून साजश्रृंगार केलेला होता. खऱ्या तृतीतंपथीयांसारखे हातवारे करून नागरिकांना जबरीने पैशांची मागणी करीत होते. तृतीयपंथीय आम्रपाली यांनी त्या तोतयांना पकडल्यानंतर त्यांची पोलखोल झाली. ते तिन्ही तोतया पुरुष असल्याचे आढळून आले. त्यांच्याजवळ पॅन्ट, शर्ट, कणिक व अन्य साहित्य आढळून आले.

Web Title: The hatred chased the third

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.