हवाल्याचे स्थानिक सुत्रधार ‘अंडरग्राऊंड’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:06 AM2021-08-02T04:06:21+5:302021-08-02T04:06:21+5:30

अमरावती: राजापेठ पोलिसांनी ३ कोटी ५० लाख रुपयांच्या हवाला प्रकरणी स्थानिक सुत्रधारांचा वेगाने तपास चालविला आहे. स्थानिकांच्या सहभागाशिवाय एवढ्या ...

Hawala's local facilitator 'Underground'! | हवाल्याचे स्थानिक सुत्रधार ‘अंडरग्राऊंड’ !

हवाल्याचे स्थानिक सुत्रधार ‘अंडरग्राऊंड’ !

googlenewsNext

अमरावती: राजापेठ पोलिसांनी ३ कोटी ५० लाख रुपयांच्या हवाला प्रकरणी स्थानिक सुत्रधारांचा वेगाने तपास चालविला आहे. स्थानिकांच्या सहभागाशिवाय एवढ्या मोठ्या रकमेची वाहतूक, भरणा शक्यच नसल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस यंत्रणा पोहोचली. दरम्यान, न्यायालयाने तपासाची परवानगी दिल्याने राजापेठ पोलीस आता हवाला प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणार आहे. सबब, हवाल्याचे स्थानिक सुत्रधार ‘अंडरग्राऊंड’ झाले आहेत. पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली आहे.

२७ जुलै रोजी राजापेठ पोलिसांनी फरशी स्टॉप भागातून ताब्यात घेतलेल्या दोन महागड्या व एकाच रंगाच्या चारचाकी वाहनांमधून तब्बल ३.५० कोटी रुपये जप्त केले. जप्ती ते मोजदाद व्हाया पंचनामा अशी सलग नऊ ता. ही मेगा कारवाई चालली. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह या अगदी पहाटेपासून या जंबो कारवाईवर लक्ष ठेऊन होत्या. ३.५ कोटींसह चार चालकांना ताब्यात घेतल्यानंतर सकाळी ८.३० च्या सुमारास राजापेठ पोलिसांनी फरशी स्टॉप परिसरातील अपार्टमेंटमधील एका फ्लॅटची झाडाझडती घेतली. जेथून रक्कम वाहनात भरण्यात आली, तेथून निलेश भरतभाई पटेल (२७, ह.मु. फरशीस्टॉप, मुळ रा. सांचल, ता. जि. मैसाणा, गुजरात) व जिग्नेश राजेश गिरीगोसावी (२६, रा. मैसाणा) यांना अटक करण्यात आली. त्या फ्लॅटमधून १.५० लाख रुपये रोख व दोन मनी काउंटिंग मशिन जप्त करण्यात आल्या. ती संपुर्ण रक्कम आपण अमरावतीतूनच भरल्याची कबुली चालकांसह त्या दोघांनी देखील दिली. या संपुर्ण कालावधीत ताब्यात घेतलेल्या सहाही जणांनी पोलिसांना फारसे सहकार्य केले नाही.

प्रकरण न्यायालयात

लगेच दुसर्या दिवशी अहमदाबादस्थित निना शहा यांनी ती रक्कम आपली असल्याचा दावा सीए वकीलाकरवी केला. तर, तिसर्या दिवशी हे प्रकरण स्थानिक न्यायालयात पोहोचले. पोलिसांनी ताब्यात घेतलेले सहाजण चौकशीला सहकार्य करत नसल्याने सखोल चौकशीशिवाय संबंधित कंपनीला ती रक्कम परत करण्यात येऊ नये, असा अर्ज आयकर विभागाने न्यायालयात दाखल केला. तर, पोलिसांचा अर्ज स्विकारून ४ ऑगस्ट रोजी ‘से’ दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.

‘से’ दाखल करण्यापुर्वी वेग

याप्रकरणात ‘से’ दाखल करण्यापुर्वी पोलिसांना देखील आपली बाजू भक्कम करावयाची आहे. चौकशीदरम्यान ताब्यात घेतलेल्या सहा जणांनी पैसा येथूनच भरला, मुंबई औरंगाबाद जात होता, एवढीच कबुली दिली. मात्र, त्यापुढील अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. तपासाला परवानगी मिळाल्याने आता पोलीस त्या सहा जणांचे मोबाईल सीडीआर, स्थानिक संबंध व एकूणच प्रकरणाच्या तळाशी जाणार आहेत.

कोट

न्यायालयाने तपासाची परवानगी दिली आहे. ‘से’ दाखल करावयाचा आहे. रक्कम वैध होती, तर दडवून का नेत होते, हा आमचा प्रश्न असेल.

मनीष ठाकरे,

ठाणेदार, राजापेठ

Web Title: Hawala's local facilitator 'Underground'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.