पत्नीला सळाखीने मारहाण दोन चिमुकल्यांना विष पाजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2022 05:00 AM2022-05-04T05:00:00+5:302022-05-04T05:01:00+5:30

नेहमीप्रमाणे मंगळवारी देखील त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यामुळे पूर्ण कुटुंब पॉवर हाऊसनजीकच्या झोपडीत आले. तेथे महेंद्रने पत्नी ज्योत्स्ना हिला सळाखीने मारहाण केली. ती जीव वाचवत बाहेर पडली असता, त्याने आदर्श व अनन्या या चिमुकल्यांना पेल्यातून तणनाशक विषारी द्रव्य पाजले. त्यावेळी तो थोडादेखील थरथरला नाही. बाबा, काहीतरी पाजत आहेत, असे वाटल्याने चिमुकल्या आदर्शने ते द्रव्य प्राशन केले, तर अनन्या तर अबोधच होती. मुलांना पाजल्यानंतर महेंद्रने देखील तेच तणनाशक प्राशन केले.

He beat his wife with a stick and poisoned two Chimukals | पत्नीला सळाखीने मारहाण दोन चिमुकल्यांना विष पाजले

पत्नीला सळाखीने मारहाण दोन चिमुकल्यांना विष पाजले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : घरगुती किरकोळ वादातून सळाखीने पत्नीला मारहाण केल्यानंतर एका माथेफिरूने पोटच्या दोन मुलांना विषारी औषध पाजले. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानेदेखील विषारी द्रव्य प्राशन करून आत्मघात करण्याचा प्रयत्न केला. यात त्याच्या पाच वर्षीय मुलाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून, त्याला व त्याच्या दोन वर्षीय बहिणीला नागपूर येथे हलविण्यात आले आहे. नांदगाव पेठ येथील पॉवर हाऊसनजीकच्या झोपडपट्टी परिसरात मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.
याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी आरोपी महेंद्र सुभाष राऊत (वय ३२, रा. माळीपुरा, नांदगाव पेठ) याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०७, ३२८, ३२३, ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी सकाळी ११.५० मिनिटांच्या सुमारास पती महेंद्र याने किरकोळ वादातून आपल्याला सळाखीने मारहाण केली. तथा आपल्या आदर्श (वय ५) व अनन्या (२) या दोन मुलांना विष पाजले. त्याने देखील विष घेतल्याची तक्रार महेंद्र राऊत याची पत्नी ज्योत्स्ना राऊत (२४) हिने नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात नोंदविली. जिल्हा सामान्य रुग्णालयात तिचा जबाब नोंदविण्यात आला. यात आदर्शची प्रकृती अत्यंत गंभीर झाली असून, त्याच्यासह अनन्याला देखील नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले आहे. स्वत:च्या प्रकृतीची काळजी न करता ज्योत्स्ना यादेखील मुलांसोबत नागपुरात गेल्या आहेत. 
दरम्यान, या प्रकरणात किरकोळ वादातून महेंद्रने हे टोकाचे पाऊल उचलल्याची पोलीस दफ्तरी नोंद आहे. मात्र आदर्शच्या शाळा प्रवेशावरुन दोघांमध्ये टोकाचे मतभेद झाले. त्यातून महेंद्रने हे पाऊल उचलल्याचा अन्य एक घटनाक्रम समोर आला आहे. ज्योत्स्ना राऊत यांच्या आईने हा घटनाक्रम विषद केला असून जावाई महेंद्र याने आपल्या मुलालादेखील मारहाण केली, असा आरोप त्यांनी केला आहे. हा घटनाक्रम अद्यापपर्यंत पोलीस दप्तरी नोंदविला गेलेला नाही. महेंद्र राऊत याच्या अटकेनंतरच या घटनेमागचा उलगडा होईल, अशी माहिती नांदगाव पेठ पोलिसांनी दिली आहे. पोलीस व डॉक्टर आदर्शच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहेत, 

तो वाॅर्ड क्रमांक १०,  ती वाॅर्ड क्रमांक १२ मध्ये
सुमारे १२.४५ च्या सुमारास ज्योत्स्ना मुलांना घेऊन इर्विनमध्ये पोहोचली, तर काही प्रत्यक्षदर्शींनी महेंद्रला देखील इर्विनला आणले. त्याच्यावर वाॅर्ड क्रमांक १० मध्ये उपचार सुरू आहेत, तर ज्योत्स्नाला वाॅर्ड क्रमांक १२ मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, पोटचे गोळे अत्यवस्थ असल्याने स्वत:च्या प्रकृतीची काळजी न करता तिने सुटी घेतली. ती मुलांसोबत नागपूरला गेली.

रोजच झडत होते वाद
नांदगाव पेठ येथील माळीपुरा येथे राहणाऱ्या राऊत दाम्पत्यात नेहमीच वाद झडत होते. माळीपुऱ्यासह महेंद्र हा नजीकच्या पॉवरहाऊस परिसरातील अतिक्रमित झोपडीत देखील राहत होता. नेहमीप्रमाणे मंगळवारी देखील त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यामुळे पूर्ण कुटुंब पॉवर हाऊसनजीकच्या झोपडीत आले. तेथे महेंद्रने पत्नी ज्योत्स्ना हिला सळाखीने मारहाण केली. ती जीव वाचवत बाहेर पडली असता, त्याने आदर्श व अनन्या या चिमुकल्यांना पेल्यातून तणनाशक विषारी द्रव्य पाजले. त्यावेळी तो थोडादेखील थरथरला नाही. बाबा, काहीतरी पाजत आहेत, असे वाटल्याने चिमुकल्या आदर्शने ते द्रव्य प्राशन केले, तर अनन्या तर अबोधच होती. मुलांना पाजल्यानंतर महेंद्रने देखील तेच तणनाशक प्राशन केले. हाकेच्या अंतरावर असलेल्या ज्योत्स्नाला ते माहीत होताच, ती पिल्लांना बिलगून रुग्णालयात घेऊन आली.

 

Web Title: He beat his wife with a stick and poisoned two Chimukals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.