‘तो’ चढला पाण्याच्या टाकीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 10:33 PM2018-10-07T22:33:56+5:302018-10-07T22:34:23+5:30

वडिलांच्या हत्या प्रकरणातील तपास अधिकारी एपीआय महेश नरवणे यांच्याकडील तपास पूर्ववत करावा, या मागणीसाठी अब्दुल शारूख अब्दुल करीम (२२,रा. मिर्झापुरा, वलगाव) रविवारी आठवडी बाजारातील पाण्याच्या टाकीवर चढल्याने खळबळ उडाली.

'He' climbed up the water tank | ‘तो’ चढला पाण्याच्या टाकीवर

‘तो’ चढला पाण्याच्या टाकीवर

Next
ठळक मुद्देवलगाव सरपंच हत्याप्रकरण : तपासाला गती मिळण्यासाठी विरुगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वडिलांच्या हत्या प्रकरणातील तपास अधिकारी एपीआय महेश नरवणे यांच्याकडील तपास पूर्ववत करावा, या मागणीसाठी अब्दुल शारूख अब्दुल करीम (२२,रा. मिर्झापुरा, वलगाव) रविवारी आठवडी बाजारातील पाण्याच्या टाकीवर चढल्याने खळबळ उडाली. दुपारी १ वाजताच्या सुमारास सुरू झालेले हे विरुगिरीचे नाट्य एपीआय नरवणे यांच्याकडे तपास देण्याच्या आश्वासनानंतर संपुष्टात आले.
२३ नोव्हेंबर २०१६ रोजी वलगावात सरंपच हत्याकांड घडले होते. या घटनेला पावणेदोन वर्षे झाले. तपास अधिकारी महेश नरवणे यांचीही बदली झाली. मात्र पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांशी बोलल्यानंतरच टाकीवरून खाली उतरेन, असा पावित्रा अब्दुल शारुख याने घेतला. अब्दुल हा रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास वलगावच्या आठवडी बाजार परिसरातील पाण्याच्या टाकीवर चढला. त्याने मोबाईलवरून एका व्हॉटसअ‍ॅप समूहावर व्हिडीओ व्हायरल केला. त्यात त्याने वडील अब्दुल करीम अब्दुल जलील यांच्या हत्येच्या घटनेचा उल्लेख करून या प्रकरणाच्या तपासाला गती मिळण्याबाबत भाष्य केले. या घटनेच्या माहितीवरून वलगावचे ठाणेदार दुर्गेश तिवारी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी अब्दुलला समजाविण्याचे प्रयत्न केला. मात्र, आपल्या मागणीवर तो ठाम होता. त्यामुळे याची माहिती तिवारी यांनी वरिष्ठांनी दिली. अग्निशमन दलाची मदतीने अब्दुलला टाकीवरून खाली उतरविण्यात आले. पोलिसांनी तपास नरवणे यांच्याकडे देण्याचे आश्वासन दिल्यानंतर अब्दुल टाकीवरून खाली उतरला.
पालकमंत्री, सीपींना बोलवा
अब्दुल शारुख टाकीवर चढल्यानंतर त्याने एक चिठ्ठी खाली फेकली. त्या चिठ्ठीत पालकमंत्री व पोलीस आयुक्तांना बोलवा, त्यांच्याशी बोलल्यानंतरच मी खाली उतरेन, असे नमूद केले होते. त्या अनुषंगाने पीआय तिवारी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाददेखील साधला.

वलगाव सरपंच हत्याकाडाच्या तपासाला गती मिळावी, तपास अधिकारी एपीआय नरवणेकडे तपास द्यावा, यासाठी अब्दुल शारुख टाकीवर चढला. आश्वासनानंतर तो खाली उतरला.
- दुर्गेश तिवारी,
पोलीस निरीक्षक

Web Title: 'He' climbed up the water tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.