मुलींची परीक्षा घेणारा ‘तो’ एक पूल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:16 AM2021-08-25T04:16:47+5:302021-08-25T04:16:47+5:30

फोटो पी २४ रोहनखेड पुलावरील पाण्याने अन्यत्र मुक्काम : पेढी बॅरेज रखडल्याने नादुरुस्त पूल झाला जीवघेणा अमरावती : अमरावती ...

‘He’ is a pool that tests girls! | मुलींची परीक्षा घेणारा ‘तो’ एक पूल !

मुलींची परीक्षा घेणारा ‘तो’ एक पूल !

Next

फोटो पी २४ रोहनखेड

पुलावरील पाण्याने अन्यत्र मुक्काम : पेढी बॅरेज रखडल्याने नादुरुस्त पूल झाला जीवघेणा

अमरावती : अमरावती तालुक्यातील रोहणखेडा पर्वतापूर हे इवलेसे गाव. २०११ साली या गावाची लोकसंख्या केवळ ५२७. ती आता वाढून दुपटीवर गेल्याचा अंदाज आहे. या गावावर दरवर्षी पेढी कोपते. पुराच्या पाण्याने या गावचा मुख्यालयाशी संपर्क तुटतो. लोकप्रतिनिधी भेटीदेखील देतात. पुलाची स्थिती, उंची मात्र वर्षानुवर्षे ‘जैसे थे’ आहे. यंदा तर तेथील जीवघेण्या पुलाने विद्यार्थिनींची परीक्षाच घेतली. तेथील नऊ विद्यार्थिनींना गाव सोडून दुसऱ्या गावात वर्गशिक्षिकेच्या माहेरी मुक्कामी राहावे लागले.

अमरावती-कठोरा मार्गाने पुसदा गावातून रोहणखेडला रस्ता जातो. या गावाशेजारून पेढी नदी वाहते. रोहणखेड गावानजीकच पुसदा या गावाला जोडणारा पूल आहे. पेढीला पूर आला की, पुलावरून दुथडी भरून पाणी वाहते. अगदी गावातदेखील तलाव साचतो. परिणामी रोहनखेडचा संपर्क तुटतो.

मोहरमच्या दिवशी आक्रित घडले. १९ ऑगस्ट रोजी पेढी नदीला पूर आला. रोहनखेडनजीकच्या पुुलावरून पाणी वाहिले. दुपारनंतर अगदी रात्रीपर्यंत पुलावर पाणी होते. त्यामुळे पुसदा येथे शाळेत गेलेल्या आठवी, नववी व दहावीच्या नऊ विद्यार्थिनी रोहणखेडला येऊ शकल्या नाहीत. त्यांना वर्गशिक्षिकेच्या घरी पुसदा येथे रात्र काढावी लागली. त्या दुसऱ्या दिवशी घरी पोहोचल्या. तेव्हा त्यांच्या पालकांचा जीव भांड्यात पडला. या पुुुलावर मोठी भगदाडे पडली आहेत. त्यामुळे फुटभर पाण्यातून जातानाही अपघात होतात.

म्हणून रखडला पूल

रोहणखेड गावाजवळच्या या पुलाची उंची वाढवून तो नव्याने बनवावा, असा प्रस्ताव ग्रामपंचायतीने अनेकदा दिला. मात्र, तो प्रस्ताव पेढी बॅरेजच्या उपसा सिंचन प्रकल्पामुळे रखडला आहे. पेढी बॅरेज उपसा सिंचन प्रकल्पाला २००८ मध्ये मान्यता मिळाली. या प्रकल्पात रोहणखेड येथील ४३७ आणि दोनद येथील १५० कुटुंबांचे पुनर्वसन करायचे आहे. मात्र, पुसदा येथील पुनर्वसनाकरिता प्रकल्पग्रस्तांचा विरोध आहे. भूखंडाऐवजी एकमुस्त मोबदला देण्याची मागणी आहे. ती रखडल्याने व गाव प्रकल्पबाधित असल्याने पुलाचे बांधकामही रखडले आहे.

कोट

मोहरमच्या दिवशी पेढी नदीला पूर आल्याने पूल ओलांडणे धोकादायकच होते. परिणामी एक रात्र पुसदा येथे शिक्षिकेच्या माहेरी काढावी लागली. दरवर्षीच ही परिस्थिती उद्भवते.

- श्रावणी तायडे, विद्यार्थिनी, रोहणखेडा

Web Title: ‘He’ is a pool that tests girls!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.