'त्या' अनोळखी वृद्धेच्या सेवेला धावले अनेक हात!
By admin | Published: May 6, 2016 12:07 AM2016-05-06T00:07:16+5:302016-05-06T00:07:16+5:30
भारतीय संस्कृतीत निष्काम सेवेला अनन्य साधारण महत्व आहे. भगवत्गीतेतसुद्धा 'कर्मण्ये वाधिकारम्य मा फलेषू सदाचन' अर्थात कर्म करीत रहा, फळाची इच्छा करु नको, असे म्हटले आहे.
दिया येथील घटना : नालीत पडल्याने वृद्धा जखमी
धारणी : भारतीय संस्कृतीत निष्काम सेवेला अनन्य साधारण महत्व आहे. भगवत्गीतेतसुद्धा 'कर्मण्ये वाधिकारम्य मा फलेषू सदाचन' अर्थात कर्म करीत रहा, फळाची इच्छा करु नको, असे म्हटले आहे. या संस्कृतीचे पालन आजही करण्यात येत असल्याचा प्रकार पहावयास मिळतो.
धारणीपासून ५ किमी अंतरावरील दिशा या गावात एक ७० वर्षीय म्हातारी रात्री नालीत पडून जखमी झाली. तिची ओरड ऐकून गावातील युवक तेथे पोहोचले. तिला बाहेर काढले व हनुमान मंदिरात आणून सोडले. ती रात्रभर तशीच पडून होती.
सकाळी लोकांना ती दिसताच तिची विचारपूस सुरू झाली. तिला पाणी, चहा व वरण भात काही मुली व युवकांनी दिले. तिची भाषा कोणालाच कळेना. ती मध्यप्रदेशातील असावी, असा अंदाज आला. ती एक असहाय्य वृध्दा आहे. तिला मदतीची गरज असल्याचे लोकांनी ओळखले.
तिच्यावर मायेची फुंकर घालणे सुुरू असताना प्रस्तुत प्रतिनिधी व वार्ताहर सुरेंद्र देशमुख तेथे पोहोचले. तिला नालीत पडल्याने असाहय वेदना होत होत्या. परिस्थितीचे गांभीर्य पाहून त्वरित १०८ क्रमांकावर संपर्क साधून अँब्युलन्स दिया गावात बोलविले. तिचेसोबतच कोणीच येण्यास तयार नसल्याने सुरेंद्र देशमुख याला अॅमब्युलसमध्ये बसूवन उप जिल्हा रुग्णालय गाठण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात तिचेवर तातडीने उपचार सुरु करण्यात आले असून सध्या तिची प्रकृती बरी आहे. मात्र ती कोण आहे ? कुठून आली ? तिचे घर कुठे आहे ? ती दिया गावापर्यंत कशी पोहोचली, हे प्रश्न अनुत्तरीतच आहे. तिची ओळख पटवून घरापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. (तालुका प्रतिनिधी)