‘त्याने’ परतविले सापडलेले पाकीट, ‘सोशल मीडिया’ ठरला दुवा !

By admin | Published: February 2, 2015 10:56 PM2015-02-02T22:56:05+5:302015-02-02T22:56:05+5:30

सोशल मीडियाच्या गैरवापराबाबत नेहमीच चर्चा सुरु असते. परंतु नाण्याची दुसरी बाजू नेहमीच दुर्लक्षित राहते. परंतु एका एसटी डेपो परिसरात सापडलेले पैशाचे पाकीट ‘फेसबुक’च्या माध्यमातून परत करून

'He' returned the wallet found, 'Social media' link! | ‘त्याने’ परतविले सापडलेले पाकीट, ‘सोशल मीडिया’ ठरला दुवा !

‘त्याने’ परतविले सापडलेले पाकीट, ‘सोशल मीडिया’ ठरला दुवा !

Next

जितेंद्र दखणे - अमरावती
सोशल मीडियाच्या गैरवापराबाबत नेहमीच चर्चा सुरु असते. परंतु नाण्याची दुसरी बाजू नेहमीच दुर्लक्षित राहते. परंतु एका एसटी डेपो परिसरात सापडलेले पैशाचे पाकीट ‘फेसबुक’च्या माध्यमातून परत करून एका तरूणाने प्रामाणिकपणाचा आगळा परिचय तर दिलाच. पण, सोशल मिडियाचा कसा सदुपयोग होऊ शकतो, याचे उदाहरणही घालून दिले.
जिल्हा परिषदेत विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत प्रमोद ताडे २५ जानेवारी रोजी अमरावती येथून त्यांच्या मूळ गावी म्हणजे अकोट तालुक्यातील निजामपूर येथे गेले होते. त्याच दिवशी सायंकाळी एसटीने परतीचा प्रवास करीत असताना त्यांचे पैशाचे पाकीट बसस्थानकावर हरविले. वाहकाने तिकीट काढण्यास सांगितले असता त्यांच्या लक्षात पाकीट हरविल्याची बाब आली. अचानकच हा प्रसंग ओढवल्यामुळे त्यांच्याकडे तिकिटासाठीही पैसे नव्हते. शेवटी सहप्रवाशांनी त्यांना धीर दिला. इतकेच नव्हे, तर श्रीनिवास उदापुरे यांनी माणुसकीचा परिचय देत त्यांचे प्रवास भाडे दिले. दुसऱ्या दिवशी प्रजासत्ताक दिनाची सुटी असल्याने हरविलेल्या पाकिटातील एसबीआय व अलाहाबाद बँकेचे एटीएम ताडे यांनी २७ जानेवारी रोजी लॉक केले. एक दिवस अकस्मात त्यांच्या भ्रमणध्वनीवर रोशन मनोहरलाल गुप्ता नामक अमरावती येथील व्यक्तीचा कॉल आला. सदर व्यक्तीने त्यांना त्यांचे हरविलेले पाकीट सुरक्षित असल्याची माहिती दिली. ताडे यांना ही बातमी ऐकून सुखद धक्का बसला. परंतु पाकिटातील कागदपत्रांवर कुठेही मोबाईल नंबर नसताना गुप्ता यांनी तो कसा मिळविलाल हा प्रश्न ताडे यांना पडला होता. याबाबत विचारणा केल्यानंतर गुप्ता यांनी संपूर्ण घटनाक्रमाचा उलगडा केला. गुप्ता यांना पाकीट सापडल्यानंतर त्यांनी पाकिटातील एटीएम कार्डवरील नावाच्या आधारे प्रमोद ताडे यांचे फेसबुकवरील प्रोफाईल शोधले. त्यावरुन त्यांना त्यांची प्राथमिक माहिती मिळाली. परंतु प्रोफाईलवर ताडे यांचा भ्रमणध्वनी क्रमांक नसल्याने त्यांनी त्यांची ‘फ्रेंडलिस्ट’ शोधली. त्यामधून अकोला येथील संतोष टाले या ताडे यांच्या मित्राचा मोबाईल नंबर त्यांना गवसला. या क्रमांकावर संपर्क करून त्यांनी ताडेंंचा क्रमांक मिळविला व पाकीट सुरक्षित असल्याचे सांगितले. ताडेंनी गुप्ता यांच्याकडे जाऊन पाकीट परत मिळविले. साधारण आर्थिक स्थिती असूनही दिलेले बक्षीस गुप्ता यांनी नाकारून प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम गुण असल्याचे सिध्द केले.

Web Title: 'He' returned the wallet found, 'Social media' link!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.