घटस्फोटासाठी त्याने पत्नीला उपाशी ठेवले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 01:22 PM2021-08-13T13:22:49+5:302021-08-13T13:23:15+5:30

Amravati News पत्नीमागे घटस्फोटासाठी तगादा लावून पतीने तिला उपाशी ठेवून मारहाण केली तथा घराबाहेर काढल्याचा मुद्दादेखील तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.

He starved his wife for divorce! | घटस्फोटासाठी त्याने पत्नीला उपाशी ठेवले!

घटस्फोटासाठी त्याने पत्नीला उपाशी ठेवले!

Next
ठळक मुद्देथंडीत कुडकुडत बसवून क्रूर वर्तन, घराबाहेर काढले

 

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : सासरच्या मंडळीने मागणी केल्याप्रमाणे महागड्या हॉटेलमध्ये लग्न करूनही, वेळोवेळी मोठी रक्कम देऊनही आपला अनन्वित छळ चालविल्याची तक्रार एका विवाहितेने गाडगेनगर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली. पत्नीमागे घटस्फोटासाठी तगादा लावून पतीने तिला उपाशी ठेवून मारहाण केली तथा घराबाहेर काढल्याचा मुद्दादेखील तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.

अमरावती येथीलच एका तरुणीचा सन २०१६ मध्ये आरोपी शिशीर शरद किनकर (३४, रा. ३४, तळमेळे इस्टेट, त्रिमूर्ती नगर, अमरावती) याच्याशी झाला. त्यावेळी आरोपीने पीडिताच्या वडिलांना ५० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या चेनची मागणी केली होती. ती पूर्ण करण्यात आली. आरोपीने लग्नाकरिता महागड्या हॉटेलसह महागड्या जेवणाची मागणी केली. ती कशीबशी पूर्ण केल्यानंतरही आरोपी शिशीरने वेळोवेळी मोठमोठ्या रकमेची मागणी केली. ऐपतीनुसार त्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न पीडिताच्या माहेराने केला. मात्र, त्यानंतरही आरोपी पती हा आपल्याला खर्चाकरिता एक पैसाही देत नव्हता. त्याने आपल्याला अनेकदा उपाशी ठेवून मारहाण केली. घराबाहेर काढून दिले. थंडीत कुडकुडत बाहेर बसविण्याचे क्रूर वर्तनदेखील त्याने केले. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर पत्नीने घटस्फोट द्यावा, असा तगादा लावून मारहाण केली. ३ सप्टेंबर २०१६ पासून हा छळ सुरू होता. याप्रकरणी ११ ऑगस्ट रोजी दुपारी गाडगेनगर पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली. आरोपी शिशीर शरद किनकर याच्याविरुद्ध कलम ४९८ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

लग्नामध्ये हुंड्याची व नंतर अवाजवी पैशाची मागणी करून पती व तीन महिलांनी आपल्याला मारहाण करून छळ केला, अशी तक्रार मालूनगर येथील माहेरवाशिणीने नोंदविली. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी आरोपी स्वप्निल ज्ञानेश्वर कराळे (रा. नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे) व तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: He starved his wife for divorce!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.