पाचशे रुपये देतो म्हणत छेड, जीवे मारण्याची धमकी
By प्रदीप भाकरे | Published: October 7, 2023 05:11 PM2023-10-07T17:11:57+5:302023-10-07T17:12:09+5:30
विनयभंग, धमकी व पॉस्कोअन्वये गुन्हा दाखल
अमरावती : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून वाच्यता केल्यास फाशी देऊन मारून टाकण्याची धमकी तिला देण्यात आली. ३ ऑक्टोबर रोजी रात्री ११ ते १२ च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी, खोलापुरी गेट पोलिसांनी आरोपी अकबर शहा अजगर शहा (३९, रा. हनुमाननगर) याच्याविरूद्ध ६ ऑक्टोबर रोजी विनयभंग, धमकी व पॉस्को अन्वये गुन्हा दाखल केला.
पिडत अल्पवयीन मुलीची आई उपचारार्थ दवाखान्यात दाखल असल्याने ती घरी एकटीच होती. मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास आरोपी अकबरशहा हा तिच्या घरात शिरला. तिला ५०० रुपये देतो म्हणून तिचा विनयभंग केला. त्यामुळे ती रडू लागली. त्यावर हा प्रकार कुणाला सांगितला, तर फाशी देऊन जीवाने मारून टाकण्याची धमकी आरोपीने तिला दिली.
दरम्यान आई दवाखान्यातून परतल्यानंतर ती बाब तिने तिला सांगितली. मात्र बदनामीच्या भीतीपोटी ती धजावली नाही. मात्र, आता तक्रार न दिल्यास आरोपी पुन्हा देखील आपल्या मुलीची छेड काढेल, या भीतीपोटी अखेर महिलेने आपल्या अल्पवयीन मुलीला घेऊन ६ ऑक्टोबर रोजी रात्री खोलापुरी गेट पोलीस ठाणे गाठले. तेथे तक्रार नोंदविली