‘त्या’ बिबट्याने घेतला मोकळा श्वासं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 11:01 PM2018-05-13T23:01:17+5:302018-05-13T23:01:17+5:30
कीर्र रात्रीचे दोन वाजले होते. लगतचे गाव गर्द झोपत असताना सुमारे २५ वन कर्मचारी व वनाधिकारी एखाद्या मंत्र्याला असलेल्या ‘झेडप्लस’ सुरक्षेप्रमाणे रस्त्याचे लोकेशन घेत होते. सर्वांच्या मनात धाकधुक, भिती जवळपास ५० कि.मी. नंतर पार करून ठरलेल्या ठिकाणी पिंजऱ्यात जेरबंद बिबट्याला मोकळा श्वास घेण्याची परवानगी मिळाली आणि कीर्र रात्री त्याने अलविदा करीत जंगलात धूम ठोकली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पोहरा बंदी : कीर्र रात्रीचे दोन वाजले होते. लगतचे गाव गर्द झोपत असताना सुमारे २५ वन कर्मचारी व वनाधिकारी एखाद्या मंत्र्याला असलेल्या ‘झेडप्लस’ सुरक्षेप्रमाणे रस्त्याचे लोकेशन घेत होते. सर्वांच्या मनात धाकधुक, भिती जवळपास ५० कि.मी. नंतर पार करून ठरलेल्या ठिकाणी पिंजऱ्यात जेरबंद बिबट्याला मोकळा श्वास घेण्याची परवानगी मिळाली आणि कीर्र रात्री त्याने अलविदा करीत जंगलात धूम ठोकली.
शनिवारी रात्री १ वाजता पाण्याच्या शोधात बिबट विहिरीत जाऊन पडला. वनाधिकाऱ्यांना ही माहिती मिळताच सर्वजण घटनास्थळी दाखल झाले. कीर्र रात्र डरकाळ्या फोडणारा तीक्ष्ण दाताचा बिबट पिंजºयात अडकवण्याचे कार्य पहाटे ६ वाजेपर्यंत चालले. अखेर एका कोंबडीच्या लालसेने तो पिंजºयात अडकला.
'तो' बिबट परतला स्वगृही
लोकांच्या नजरा चुकवित त्या बिबट्याला एका वाहनाने पोहरा-चिरोडी वनक्षेत्रात आणले. त्याची वैद्यकीय तपासणी करून घेण्यात आली. दिवसभर तळ ठोकून असलेल्या अमरावती वनविभागाचे उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांनी ज्या ठिकाणी तो बिबट पिंजऱ्यात अडकला त्याच वनक्षेत्रात सोडण्याचा निर्णय झाला आणि पोहरा जंगलातून रात्री ९ वाजता प्रवास सुरू झाला. ५० कि.मी. अंतरावर वाहनातून भारदस्त बिबट्या नेणे जोखमीचे होते. अशात त्याच्या दिमतीला एखाद्या मंत्र्यांप्रमाणे मागेपुढे वाहनांचा ताफा , २५ वनकर्मचारी, अधिकारी असा प्रवास सुरू झाला. गतिरोधक, गर्दी हे सर्व पार करीत अखेर बिबट्याला त्याच्या स्वगृही आणण्यात आले. समयसुचकता ठेवून वनकर्मचाऱ्यांनी वाहनात दडून बसत पिंजºयाचे दार उघडले व तो जंगलात दिसेनासा झाला. अखेर रात्री २ वाजता २३ तासांचे आॅपरेशन फत्ते झाले.