'त्यांनी' मालगाडीतून केला मुंबई ते बडनेरा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 06:06 PM2020-04-27T18:06:51+5:302020-04-27T18:08:28+5:30
अमरावती येथील नवीवस्ती परिसरातील दोन युवक मुंबईहून चक्क मालगाडीने प्रवास करीत रविवार दाखल झाल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली. या दोन्ही युवकांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याची माहिती असून, त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.
श्यामकांत सहस्त्रभोजने
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील नवीवस्ती परिसरातील दोन युवक मुंबईहून चक्क मालगाडीने प्रवास करीत रविवार दाखल झाल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली. या दोन्ही युवकांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याची माहिती असून, त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. सध्या कोरोना संसगार्मुळे आवागमनास बंदी आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोना लागण मुंबई येथे आहे. तेथूनच ते आल्याने शहरवासी धास्तावले आहेत.
मुंबईहून २६ एप्रिल रोजी दोन युवक बडनेऱ्यात आले. ते दोघेही शहरात बिनधास्त फिरत असल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती वाढली. काहींनी बडनेरा पोलीस व आरोग्य प्रशासनाला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर सदर युवकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती मिळाली. या दोन्ही युवकांना १४ दिवसांसाठी होम क्वारंटाइन करण्यात आले. सोमवारी आरोग्य विभागाची चमूदेखील सदर युवकांच्या घरी गेली. हे दोघेही मालगाडीने मुंबईहून अकोलापर्यंत आल्याची माहिती आरोग्य प्रशासनाकडे आहे.
मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी बडनेऱ्यातदेखील एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने शहरवासी धास्तावले आहेत. या दोघांनीही बाहेर पडू नये, असा सल्ला त्यांना आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आला आहे.
तेलंगणाकडे पायी जाणारे विद्यार्थी क्वारंटवाइन
तेलंगणातील १२ मुली व सात मुले असे १९ विद्यार्थी अमरावती येथील महादेवखोरीत भाड्याने राहत होते. लॉकडाऊनमुळे ते विद्यार्थी मूळ गावी परतू शकले नाहीत. हल्ली भाडे देणेही कठीण झाले. त्यातच घराची ओढ लागल्याने ते सर्व विद्यार्थी पायी निघाले होते. मात्र, बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून महामार्गावरून जाणाºया या सर्व विद्यार्थ्यांना थांबविण्यात आले. हे सर्व १९ विद्यार्थी भातकुली येथे एका हॉलमध्ये क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती आहे.