दिवसाला १ हजार कमवायला गेला अन् ३३ लाखांना चूना लागला! नेमकं काय घडलं?

By प्रदीप भाकरे | Published: October 25, 2023 02:51 PM2023-10-25T14:51:49+5:302023-10-25T14:52:19+5:30

टेलिग्राम, व्हॉटसॲप युजरसह १३ वेगवेगळ्या बॅंक खातेधारकाविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

He went to earn 1 thousand a day and 33 lakhs got lime know about What exactly happened | दिवसाला १ हजार कमवायला गेला अन् ३३ लाखांना चूना लागला! नेमकं काय घडलं?

दिवसाला १ हजार कमवायला गेला अन् ३३ लाखांना चूना लागला! नेमकं काय घडलं?


अमरावती: पर्यटन कंपनीच्या संकेतस्थळावर रेटिंग दिल्यास दिवसाला एक हजार रुपये मिळतील असे सांगून काही भामट्यांनी येथील एकाची ३२ लाख ८५ हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी २३ ऑक्टोबर रोजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. त्यानुसार टेलिग्राम, व्हॉटसॲप युजरसह १३ वेगवेगळ्या बॅंक खातेधारकाविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

फसवणूक झालेले व्यक्ती शहरातील रहिवासी आहेत. एप्रिल महिन्यात त्यांना मोबाईलमधील टेलिग्राम ॲपवर एक संदेश आला होता. पर्यटन घडवून आणणाऱ्या टूरिस्ट कंपनीच्या संकेतस्थळावर रेटिंग दिल्यास घरबसल्या दिवसाला १ हजार ते दिड हजार रुपये मिळतील. असे या संदेशात सांगण्यात आले होते. त्या गृहस्थाने या कामास सहमती दर्शविल्यानंतर त्याला एक संकेतस्थळ प्राप्त झाले. त्यानंतर या तरूणाने त्याच्या बॅंक खात्याची माहिती या संकेतस्थळावर भरली. सुरूवातीला कंपनीने दिलेला एक टास्क पूर्ण केला. त्यांच्या खात्यात काही रक्कम आली.

त्यानंतर कंपनीने त्यांना टूरिस्ट कंपनीसोबत बॅंक व्यवहार झाल्याचे दाखविण्यासाठी तसेच पर्यटन करू इच्छिणाऱ्यांना विश्वास बसावा म्हणून काही रक्कम भरण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी तो टास्क पूर्ण करून रेटिंग दिली असता त्यांच्या खात्यात चांगली रक्कम आली. त्यानंतर सायबर भामटयांनी त्यांना पैशांचे आमिष दाखवत टास्क दिले. तथा त्यांना वेगवेगळ्या १३ बॅक खात्यात पैसे पाठविण्यास सांगितले. त्यापोटी त्यांची तब्बल ३२ लाख ८५ हजार ३७४ रुपयांनी ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. ४ एप्रिल ते १७ मे दरम्यान ती फसवणूक झाली.
 

Web Title: He went to earn 1 thousand a day and 33 lakhs got lime know about What exactly happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.