पेटीएमवर रिवाॅर्ड लागल्याचे सांगून खात्यातून ६१ हजार रूपये उडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:10 AM2021-07-24T04:10:23+5:302021-07-24T04:10:23+5:30
ओटीपीच्या आधारे बँक खात्यातून रक्कम लंपास चांदूर रेल्वे शहरातील गांधी चौक येथील घटना चांदूर रेल्वे शहरातील गांधी चौक येथील ...
ओटीपीच्या आधारे बँक खात्यातून रक्कम लंपास
चांदूर रेल्वे शहरातील गांधी चौक येथील घटना
चांदूर रेल्वे शहरातील गांधी चौक येथील घटना
चांदूर रेल्वे : पेटीएमवर रिवाॅर्ड लागल्याचे सांगून खात्यातून ओटीपीव्दारे ६१ हजार रुपये उडविल्याचा प्रकार चांदूर रेल्वे शहरातील गांधी चौकात उघडकीस आला.
पोलीस सूत्रांनुसार, चांदूर रेल्वे शहरातील एका महिलेच्या मोबाईलवर फोन आला. पेटीएमवर ४ हजार रुपयांचा रिवाॅर्ड तुम्हाला लागलेला आहे. त्यासाठी एक ॲप डाउनलोड करावे. सदर ॲप डाउनलोड केल्यावर आलेला ओटीपी सांगताच त्या महिलेच्या खात्यातील ६१ हजार १०१ रुपये कपात झाले. यानंतर महिलेने त्या मोबाइल क्रमांकावर फोन लावला असता, फोन लागला नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेच्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली. चांदूर रेल्वे पोलिसांनी २२ जुलै रोजी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ४२० तसेच ६६ सी, ६६ डी माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनात चांदूर रेल्वे पोलीस करीत आहे.