गावपुढारी सरसावले, जोरबैठकांना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 06:00 AM2020-02-29T06:00:00+5:302020-02-29T06:01:04+5:30
६ ते १३ मार्च दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी १६ मार्च रोजी होईल. उमेदवारी अर्ज १८ मार्चपर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्हवाटप होईल. मतदान २९ मार्च रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका २९ मार्चला होत आहे. १३८ प्रभागांसाठी ३६६ सदस्यांची निवड होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने गाव पातळीवरील नेते कामाला लागले असून, गावातील राजकीय गट सक्रिय झाले आहे.
यात तालुक्यातील टाकळी बु., लोणी, दहिगाव, हिवरा बु., दाभा, अडगाव, जावरा, जनुना, ढवळसरी, वाटपूर, सिद्धनाथपूर, धानोरा फशी, सारशी, कोठोडा, धानोरा गुरव, जामगाव, मांजरी म्हसला, एरंडगाव, सातरगाव, मोखड नांदसावंगी, खंडाळा खुर्द, वेणी गणेशपूर, कणी मिर्झापूर, पिंपरी निपाणी, कोहळा जटेश्वर, पापळ, पिंपरी गावंडा, फुबगाव, सेलू नटवा, शिवणी रसुलापूर, पहूर, वाढोणा रामनाथ, पिंपळगाव निपाणी, शिवरा, सालोड, खानापूर, मंगरूळ चव्हाळा, वाघोडा, सुलतानपूर, बेलोरा, धानोरा शिक्रा या $४४ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यातील गावांतील नेतेमंडळी तहसील कार्यालयात माहिती घेताना आढळून आले.
कावली वसाड/ अंजनसिंगी : जिल्ह्यातील एकूण ५२६ ग्रामपंचायतींसाठी २९ मार्च रोजी मतदान होणार आहे. त्यानिमित्ताने गाव खेड्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. पॅनेल व पॅनेलमधील उमेदावार निवडण्यासाठी बैठकांचा रतीब घातला जात आहे.
६ ते १३ मार्च दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी १६ मार्च रोजी होईल. उमेदवारी अर्ज १८ मार्चपर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्हवाटप होईल. मतदान २९ मार्च रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल.
निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती
अमरावती- ४६, मोर्शी ३९, धामणगाव रेल्वे- ५३, चांदूर रेल्वे- २८, तिवसा- २७, अंजनगाव सुर्जी- ३४, वरूड- ४१, भातकुली- ३४, चांदूर बाजार- ४१, दर्यापूर- ४८, चिखलदरा- १७, अचलपूर-४२, नांदगाव खंडेश्वर- ४४, धारणी- ३२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
वरूड : तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींमध्ये २९ मार्च रोजी निवडणूक होऊ घातली आहे. एकूण ८७ हजार ३७२ मतदार ४१ सरपंच व सदस्यांचे भवितव्य ठरविणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, स्वाभिमान शेतकरी संघटनेने ग्रामीण राजकारणात पाय रोवले असून, योग्य उमेदवारांचा शोध सुरू झाल्याचे चित्र आहे. निवडणुकीचा बिगूल वाजताच राजकीय वातावरण तापू लागले आहे. वरूड तालुक्यातील मालखेड, धनोडी, पुसला, झटामझिरी, सातनूर, बहादा, रोशनखेडा, कुरळी, बेनोडा, लोणी, इत्तमगाव, करजगाव, गोरेगाव, पेठ मांगरुळी, टेंभूरखेडा, झोलंबा, राजुरा बाजार, अमडापूर, वाठोडा चांदस, चिंचरगव्हाण, पवनी, वडाळा, वघाळ, गाडेगाव, काटकुंभ, हातुर्णा, मांगरुळी, सुरळी, उदापूर, एकदरा, ढगा, घोराड, देऊतवाडा, आमनेर, उराड, सावंगी, वाई (खुर्द), गणेशपूर (जामठी), लिंगा या गावांचा समावेश आहे. तालुक्यातील सर्व गावांमध्ये राजकारण तापले आहे. पॅनेलप्रमुखांच्या घरी इच्छुकांच्या येरझारा वाढल्या आहेत.