मुख्याध्यापक, शिक्षकांच्या कर्तव्याची गाईडलाईन

By Admin | Published: June 26, 2014 11:01 PM2014-06-26T23:01:50+5:302014-06-26T23:01:50+5:30

महापालिका शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकांच्या कर्तव्याची गाईड लाईन ठरली आहे. २५ सूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यावर भर देत शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले आहे.

Headman, Guidelines for Teacher's Duties | मुख्याध्यापक, शिक्षकांच्या कर्तव्याची गाईडलाईन

मुख्याध्यापक, शिक्षकांच्या कर्तव्याची गाईडलाईन

googlenewsNext

२५ सूत्री कार्यक्रम : शाळांचा दर्जा उंचावण्यावर भर
अमरावती : महापालिका शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकांच्या कर्तव्याची गाईड लाईन ठरली आहे. २५ सूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यावर भर देत शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले आहे.
शिक्षण विभागाच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीला शिक्षणाधिकारी सविता चक्रपाणी, शाळा निरीक्षक प्रवीण पाटील, सहायक कार्यक्रम अधिकारी चित्रा खोब्रागडे, शिक्षण विभाग अधीक्षक अजय भंसले, अनिकेत मिश्रा आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक, शिक्षकांच्या बैठकीत शाळेत प्रवेशोत्सव साजरा करण्याकरिता विद्यार्थ्यांना कल्पकतेने शिक्षणाची गोडी निर्माण करणे, शाळा व्यवस्थापन समितीच्या हस्ते गणवेश, पाठ्यपुस्तकाचे वाटप, शाळा प्रवेशाबाबत जनजागृती, शाळा व्यवस्थापन समितीची सभा व गठन पालक शिक्षक संघ परिवहन समितीचे गठन, पटनोंदणी पंधरवाडा, शैक्षणिक गुणवत्तेत मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी उजळणी वर्गाची रूपरेषा ठरविणे, विविध शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची अंमलबजावणी करणे, ध्वनीप्रक्षेपकाची व्यवस्था करणे,बँड पथक अनिवार्य, प्रत्येक शाळेत तक्रार निवारण केंद्र, शालेय संहिंतेचे पालन करणे, इयत्त्ता दहावीतील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार, चित्रकला, क्रिडा व व्यक्तीमत्व विकास प्रशिक्षणाचे आयोजन, विविध उपक्रमांची प्रसार व प्रचार माध्यमांना प्रसिध्दी, शाळांमध्ये निर्माण होणाऱ्या समस्या, अडचणीबाबत पाठपुरावा करणे, आपत्ती व्यवस्थापनाबाबत सतर्क राहणे अशी कर्तव्ये ठरवून देण्यात आली आहे.
गुरुवारी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. खिचडीसोबत मिष्ठान्नाचे वाटपही करण्यात आले. हा उपक्रम ६६ शाळांमध्ये राबविला.

Web Title: Headman, Guidelines for Teacher's Duties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.