मुख्याध्यापकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 10:23 PM2019-02-24T22:23:22+5:302019-02-24T22:23:36+5:30

आदिवासी विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या तालुक्यातील चिखली येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत शिकणाºया एका विद्यार्थिनीला घरी बोलावून मुख्याध्यापकानेच तिचा विनयभंग केला. पिडितेने याबाबत रविवारी सायंकाळी सात वाजता धारणी पोलिसात तक्रार दाखल केल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाने मेळघाटातील आश्रम शाळा पुन्हा वादग्रस्त ठरल्या आहेत.

Headmistress Molestation of Student | मुख्याध्यापकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

मुख्याध्यापकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

Next
ठळक मुद्देमेळघाटच्या आश्रम शाळेतील प्रकार : घरी बोलावून अश्लाघ्य प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : आदिवासी विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या तालुक्यातील चिखली येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत शिकणाºया एका विद्यार्थिनीला घरी बोलावून मुख्याध्यापकानेच तिचा विनयभंग केला. पिडितेने याबाबत रविवारी सायंकाळी सात वाजता धारणी पोलिसात तक्रार दाखल केल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाने मेळघाटातील आश्रम शाळा पुन्हा वादग्रस्त ठरल्या आहेत.
किरण कुरळकर (४५, रा. हरिसाल) असे आरोपी नराधम मुख्याध्यापकाचे नाव आहे. तो नजीकच्या हरिसाल येथे भाड्याच्या खोलीत राहतो. रविवारी दुपारी दोन वाजता कुरळकर याने आश्रम शाळेच्या अधीक्षिका अर्डक यांना दवाखान्याचे रजिस्टर मागितले आणि दोन विद्यार्थिनींना हरिसाल प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत असल्याचे सांगून दुचाकीवर हरिसाल येथे आणले. त्यातील एका विद्यार्थिनीस २० रुपये देऊन हॉटेलात बसवून ठेवले. दुसरीला आपल्या खोलीत नेले. तेथे त्याने आपल्याशी अश्लील चाळे केल्याची फिर्याद त्या पीडित विद्यार्थिनीने धारणी पोलिसात नोंदविली आहे. वृत्त लिहिस्तोवर संबंधित मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
असे फुटले बिंग, मुख्याध्यापक पळाला
एका विद्यार्थिनीला कुरळकर याने हॉटेलात बसवून ठेवल्यावर दुसरीला घरी नेले, अशी माहिती चौकात बसलेले चिखलीचे सामाजिक कार्यकर्ता देविदास कोगे व नागरिकांना समजली. त्यांनी लगेच कुरळकरचे घर गाठले. त्यावेळी मुख्याध्यापक कुरळकरने घरातून पळ काढला. मात्र त्याला पकडून नागरिकांनी त्यास विद्यार्थिनीबाबत विचारणा केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. विद्यार्थिनीने आपल्या सोबत अश्लील चाळे केल्याचे सांगताच नागरिक संतापले. कुरळकरने पुन्हा पळ काढला.
आदिवासी पालकांमध्ये संताप
यासंदर्भात माहिती मिळताच मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल, प्रकाश घाडगे, देविदास कोगे आदी नागरिक विद्यार्थिनीला घेऊन धारणी पोलिसात दाखल झाले. गत आठवड्यात टेम्ब्रूसोंडा व म्हसोना येथील शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत दोन विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण ताजे असताना चिखली आश्रमशाळेतील एका विद्यार्थिनीला हरिसाल येथील घरी नेऊन विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आल्याने आदिवासी पालकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सदर विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
- आर.व्ही.खंडारे,
सहाय्यक पोलीस निरीक्षक, धारणी

Web Title: Headmistress Molestation of Student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.