मुख्याध्यापकाची आत्महत्या

By admin | Published: November 8, 2015 12:17 AM2015-11-08T00:17:58+5:302015-11-08T00:17:58+5:30

पंचायतराज समितीच्या दौऱ्यात पोषण आहाराचा तांदूळ पॅकिंगमध्ये कमी आढळल्याने कारवाईचा धसका घेत ...

Headmistress Suicide | मुख्याध्यापकाची आत्महत्या

मुख्याध्यापकाची आत्महत्या

Next

पीआरसीचा धसका : पोषण आहाराचा तांदूळ कमी आढळला
चिखलदरा : पंचायतराज समितीच्या दौऱ्यात पोषण आहाराचा तांदूळ पॅकिंगमध्ये कमी आढळल्याने कारवाईचा धसका घेत समाडोह येथील जि.प. शाळेच्या मुख्याध्यापकाने कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला.
विजय महादेवराव नकाशे (४५) रा. अर्जुननगर अमरावती असे मृत मुख्यापकाचे नाव आहे. शुक्रवारी सेमाडोह येथील शाळेत पंचायतराज समितीच्या सदस्यांनी भेट दिली हाती. दरम्यान शाळेतील कागदपत्रे व सर्वच बाबींची तपासणी केली होती. शालेय पोषण आहाराचा साठा तपासला असता प्रत्येक बॅगामध्ये कमी तांदूळ आढळल्याने समिती सदस्यांनी त्याची विचारणा केली व तशी नोंद घेतली.

कार्यालयातच घेतला गळफास
पंचायतराज समितीचे सदस्य आ. भरत गोगवाले, विकास कुंभारे, समीर कुणावाल हे शाळा तपासणी करून धारणीकडे गेले. पोषण आहाराचा तांदूळ कमी आढळल्याने आपल्यावर कारवाई होणार या भीतीने शुक्रवारी मध्यरात्री मुख्याध्यापकांनी खुर्चीजवळ छताला दोरी बांधून गळफास घेतला. शनिवारी सकाळची शाळा असल्याने संबंधित काही शिक्षक, शिक्षिका कार्यालय उघडे दिसल्याने त्यांनी डोकावून पाहिले असता हा प्रकार उघडकीस आला.

नीता मला माफ कर !
‘नीता मला माफ कर, मला माझ्या शिक्षणाचा आणि प्रामाणिकतेचा फळ मला मिळाले, मी आत्महत्या करीत आहे.’ या आशयाची एक चिठ्ठी आत्महत्या करण्यापूर्वी मुख्याध्यापक विजय नकाशे यांनी लिहून ठेवली होती. ही चिठ्ठी कार्बन लावून लिहिली. एक चिठ्ठी पॅन्टच्या खिशात तर दुसरी राहत असलेल्या निवासात ठेवल्याचे आढळून आले. त्यांना पत्नी व दोन मुले असल्याचे संबंधित शिक्षकांकडून सांगण्यात आले.

मुख्याध्यापक विजय नकाशे यांच्या आत्महत्येसंदर्भात मर्ग दाखल करण्यात आला आहे. परिवारातर्फे कुठलीच तक्रार देण्यात आली नाही. पुढील तपास पोलीस करीत आहे.
- नितीन गवारे, ठाणेदार, चिखलदरा.

Web Title: Headmistress Suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.