भांडण्यापेक्षा समाझोता बरा, मिळेल त्यातच आनंद खरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:16 AM2021-09-15T04:16:56+5:302021-09-15T04:16:56+5:30
अमरावती : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा, मुंबई यांच्या सूचनेनुसार राष्ट्रीय लोक अदालतीचे ...
अमरावती : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा, मुंबई यांच्या सूचनेनुसार राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन शनिवार २५ सप्टेंबर रोजी जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयामध्ये सकाळी १०.३० ते संध्या ५.३० दरम्यान करण्यात येणार आहे.
आपली प्रकरणे आपसी तडजोडीने व सामंजस्याने मिटविण्याकरिता आपणास न्यायाधीश, वकील व सामाजिक कार्यकर्ते यांचे मंडळ मदत करणार आहे. या आयोजनाची विशेष बाब म्हणजे त्याकरिता कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क भरावी लागत नाही. आपले प्रलंबित खटले राष्ट्रीय लोकअदालतीसमक्ष आपसी तडजोडीने व सामंजस्याने मिटविण्याकरिता संबंधित न्यायालयात अर्ज करावा तसेच दाखलपूर्व प्रकरणाबाबत नजीकच्या संबंधित जिल्हा किंवा तालुका न्यायालय यांचेकडे संपर्क साधावा व २५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत समक्ष आपली प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अमरावतीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रवींद जोशी आणि सचिव जी.आर. पाटील यांनी केले आहे.