आरोग्य केंद्रांना मिळणार चकाकी

By admin | Published: March 30, 2016 12:38 AM2016-03-30T00:38:07+5:302016-03-30T00:38:07+5:30

जिल्हा परिषदेला ‘८ आरोग्य’ या लेखाशिर्षाखाली सन २०१४-१५ आणि २०१५-१६ साठी उपलब्ध परंतु अखर्चित राहिलेल्या ...

Health centers get glitter | आरोग्य केंद्रांना मिळणार चकाकी

आरोग्य केंद्रांना मिळणार चकाकी

Next

जिल्हा परिषद सभा : अखर्चित ११ कोटींच्या निधी विनियोगावर सभागृहात एकमत
अमरावती : जिल्हा परिषदेला ‘८ आरोग्य’ या लेखाशिर्षाखाली सन २०१४-१५ आणि २०१५-१६ साठी उपलब्ध परंतु अखर्चित राहिलेल्या मेळघाटातील अखर्चित विकास निधीबाबत झालेल्या वादळी चर्चेनंतर मंगळवारी सभागृहात पदाधिकारी व सदस्यांनी निधी खर्च करण्यास एकमताने मान्यता प्रदान केली.
दोन वर्षात आरोग्य विभागाला प्राप्त ११ कोटी ३० लाखांच्या निधीचा विनियोग करण्यात आला नव्हता. मार्च एडिंगच्या तोंडावर हा कोट्यवधींचा निधी खर्च होणार की नाही? याबाबत झेडपीमध्ये वादळ उठले होते. त्यामुळे १७ सदस्यांनी जि.प. अध्यक्ष सतीश उईके यांच्याकडे मागणी करून ही विशेष सभा बोलविण्यात आली. सभेत जि.प. आरोग्य विभागाला सन २०१४-१५ आणि २०१५-१६ या वर्षात हा निधी उपलब्ध झाला आहे. परंतु प्रशासकीय तांत्रिक अडचणीमुळे हा निधी खर्च झाला नव्हता. त्यामुळे सुमारे ११.३० कोटी रूपये परत जाण्याची शक्यता होती. त्यामुळेच मेळघाटातील धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यांतील आदिवासींच्या हक्काचा निधी विहित मुदतीत खर्च व्हावा, यासाठी सदस्यांनी पुढाकार घेतला. या निधीमधून मेळघाटातील आरोग्य उपकेंद्रांचे बांधकामाचा मुद्दा विशेष सभेत सदस्यांनी आक्रमकपणे मांडला. अध्यक्ष तथा पीठासीन सभापती सतीश उईके यांनी सदस्यांची बाजू ऐकून ११.३० कोटी रूपयांच्या निधी खर्चास मान्यता दिलीे. सभागृहाच्या या निर्णयामुळे मेळघाटातील आरोग्य केंद्र, उपकेंद्रांच्या बांधकाम,दुरूस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. सभेला अध्यक्ष सतीश उईके , उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, वृषाली विघे, अरूणा गोरले, सरिता मकेश्वर, सदस्य सुरेखा ठाकरे, सुधीर सूर्यवंशी, रवींद्र मुंदे, महेंद्रसिंग गैलवार, श्रीपाल पाल, मनोहर सुने, सदाशिव खडके, ममता भांबुरकर, मोहन सिंघवी, मोहन पाटील, उमेश केने, पं.स.सभापती विनोद टेकाडे डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे, जे.एन.आभाळे, संजय इंगळे, उन्मेश देशमुख, कैलास घोडके, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल जवंजाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले आदींसह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)

दीड कोटींचा निधी जाणार परत
जिल्हा वर्षिक योजना सन २०१४-१५ आदिवासी(टीएसपी) उपयोजना क्षेत्रातील आरोग्य संस्था व बांधकामांसाठी सुमारे ४.८३ लाख रूपयांचा निधी मिळाला होता. त्यापैकी २.६२ लाख ९० हजार रूपये खर्च करण्यात आले आहेत. यामधून उर्वरित १२ कामे प्रगतीपथावर आहेत, तर इतर कामे निविदास्तरावर आहेत. मात्र, ३१ मार्चपर्यंत १ कोटी ५० लाख रूपयांचा निधी अखिर्चित राहणार आहे. त्यामुळे हा निधी शासनाकडे परत जाणार असल्याचे डीएचओ सुरेश आसोले यांनी सभागृहात सांगितले.
याठिकाणी नवीन उपकेंद्रांच्या इमारती
जिल्हा परिषद सभागृहात २९ मार्च रोजी मंजूर ‘आठ आरोग्य’ या लेखाशिर्षांतर्गत मेळघाटातील गोंडवाडी,गोलाई, रत्नापूर, शिरपूर, कुसमकोट (बु),कुसमकोट (खु), दहेंडा, झिल्पी, जुटपाणी, बोबदो आदी उपकेंद्रांचा समावेश आहे. या कामासाठी सुमारे ७ कोटी रूपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.

येथे होणार आयुर्वेदिक, युनानी दवाखान्यांचे बांधकाम
आरोग्य विभागामार्फत आयुर्वेदिक व युनानी दवाखान्यांचे बांधकाम आदिवासी क्षेत्र योजनेमधून केले जाईल. एकताई येथे आयुर्वेदीक दवाखाना,वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवास्थान तर मोगर्दा येथे आयुर्वेदिक दवाखान्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून हिराबंबई, चटवाबोड येथील कामे जागेअभावी प्रलंबित आहेत

Web Title: Health centers get glitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.