उन्हाने वाढवल्या आरोग्याच्या तक्रारी
By admin | Published: April 1, 2015 12:24 AM2015-04-01T00:24:12+5:302015-04-01T00:24:12+5:30
मागील काही दिवसांपासून तापमानात चांगलीच वाढ झाल्याने आरोग्याच्या तक्रारीही वाढल्या आहे.
अमरावती : मागील काही दिवसांपासून तापमानात चांगलीच वाढ झाल्याने आरोग्याच्या तक्रारीही वाढल्या आहे. ताप, डोकेदुखी, अंगदुखी, ग्रॅस्ट्रो असे विविध आजार सध्या डोके वर काढत आहेत. उन्हाळ्यात योग्य आहार ठेवावा आणि बाहेर पडताना आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. सध्या शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी रुग्णालयात उन्हाळ्यातील विविध आजारांचे रुग्ण दखल घेत आहेत. उष्माघात, काविळ, डायरिया व त्वचाविकार उन्हाळ्यात उद्भवतात. इर्वीनच्या बालरुग्ण विभागात दिवसाला १० ते १५ रूग्ण दाखल होतात तर खासगी रुग्णालयातही ही वीस ते पंचवीस रुग्ण दिवसाला उपचार घेत असल्याच्या प्रतिक्रिया डॉक्टरांनी दिल्या आहेत. मुलांना उन्हापासून जपावे, डोक्याला रुमाल बांधूनच घराबाहेर पडावे असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. उन्हाळ्याच्या दिवसामागे सुती आणि सैल कपडे वापरणे लाभदायक ठरते अशा कापड विक्रेत्यांच्या प्रतिक्रिया आहेत. (प्रतिनिधी)