आरोग्य विभागाची नोकरभरती पुढे ढकलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:10 AM2021-07-01T04:10:47+5:302021-07-01T04:10:47+5:30

अमरावती : जिल्हा परिषदेतील आरोग्य कर्मचाऱ्यांची विविध रिक्त पदे भरण्याकरिता होऊ घातलेली परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रक ...

Health department recruitment postponed | आरोग्य विभागाची नोकरभरती पुढे ढकलली

आरोग्य विभागाची नोकरभरती पुढे ढकलली

Next

अमरावती : जिल्हा परिषदेतील आरोग्य कर्मचाऱ्यांची विविध रिक्त पदे भरण्याकरिता होऊ घातलेली परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. यासंदर्भात ग्रामविकास विभागाने २८ जून रोजी निर्णय जारी केला आहे. दिव्यांगांच्या नव्याने समाविष्ट प्रवर्गासाठी आणि समांतर आरक्षण बदलल्यामुळे नव्याने प्रवर्गात वाढ झाली आहे. परिणामी ठरलेल्या वेळेत परीक्षा घेणे शक्य नाही. त्यामुळे याबाबतची कार्यवाही शासनाने पुढे ढकलल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेतील गट ‘क‘ संवर्गातील मार्च २०१९ मध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत आदेश १४ जून २०२१ रोजी शासनाने काढला होता. त्यानुसार भरतीची तयारी सुरू होती. दरम्यान सामान्य प्रशासन विभागाने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास एसईसीबी प्रवर्गातील घटकांना खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना लाभ देण्याचा निर्णय शासनाने २३ डिसेंबर २०२० रोजी घेतला. ५ मे २०२१ रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास एसईबीसी प्रवर्गाच्या आरक्षणासंदर्भातील कायदा रद्द केला. त्यामुळे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास एसईसीबी प्रवर्गातील जागा अराखीव प्रवर्गात रुपांतरित झाल्या आहेत. त्यामुळे २०१९ मध्ये खुल्या प्रवर्गातील समांतर आरक्षणात बदल होत आहे. तसेच अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांचे प्रमाण कमी कालावधीसाठी १० टक्के वरून २० टक्के केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने त्याप्रमाणे अनुकंपा भरती प्रक्रिया केल्यामुळे व अन्य कारणास्तव प्रवर्गनिहाय समांतर आरक्षण निहाय जागांमध्ये बदल होत आहे. नव्या बदलांमुळे पदभरती आवश्यक आहे. पुढील आदेशानुसार सुधारित वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्यात येणार आहे.

कोट

आरोग्य विभागात २०१९ मधील नोकर भरतीची प्रक्रिया राबविण्याबाबत निर्देश दिले होते. मात्र, २८ जून रोजी ग्रामविकास विभागाने जारी केलेल्या निर्णयानुसार आता ही प्रक्रिया शासनाचे पुढील आदेश आल्यानंतरच राबविली जाईल.

- डॉ. दिलीप रणमले,

जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: Health department recruitment postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.