आरोग्यमंत्र्यांनी घेतली रुग्णालयाची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 10:53 PM2019-01-30T22:53:54+5:302019-01-30T22:55:29+5:30
राज्याचे आरोग्य तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी येथील ग्रामीण रुग्णालयाला धावती भेट दिली. आरोग्यमंत्र्याचा ताफा रुग्णालयात धडकताच डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. ना.एकनाथ शिंदे यांनी दाखल रुग्णांशी संवाद साधून डॉक्टरांना योग्य उपाययोजनेबाबत सूचना दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : राज्याचे आरोग्य तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी येथील ग्रामीण रुग्णालयाला धावती भेट दिली. आरोग्यमंत्र्याचा ताफा रुग्णालयात धडकताच डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. ना.एकनाथ शिंदे यांनी दाखल रुग्णांशी संवाद साधून डॉक्टरांना योग्य उपाययोजनेबाबत सूचना दिल्या.
अमरावती महाआरोग्य मेळाव्यासाठी ना. एकनाथ शिंदे आले होते. परतीच्या मार्गात तिवसा ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करून त्यांनी रुग्णांशी संवाद साधला. औषधीची पाहणी केली. तेथील असुविधाबाबत रुग्णांनी ना.शिंदे यांना अवगत केले. डॉक्टरांची कमतरता, कर्मचारी अनियमित. बॅकलॉग तातडीने भरण्याची मागणी रुग्णांनी केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक शामसुंदर निकम, वैद्यकीय अधीक्षक पवन मालुसरे यांनी रुग्णालयाविषयी माहिती शिंदे यांना दिली. यावेळी माजी आमदार अभिजित अडसूळ, प्रशांत वानखडे, दिनेशनाना वानखडे, प्रदीप गौरखेडे, युवासेना तालुकाप्रमुख आकाश माहूरे,ओम धनोरकर,आशीष पुनवटकर,अनूप शिंदे उपस्थित होते.
रुग्णांची आस्थेने विचारपूस
आरोग्य मंत्र्यांचा ताफा ग्रामीण रुग्णालयात धडकल्याने सर्वत्र पळापळ सुरू झाली होती. शिंदे यांनी अर्धा तास रुग्णालयात थांबून आस्थेने रुग्णांशी संवाद साधला.