आरोग्य परिचारिकांचा बदल्यांना नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:12 AM2021-07-25T04:12:24+5:302021-07-25T04:12:24+5:30
सन २०२१-२२ या वर्षातील सर्वसाधारण सर्व संवर्गातील परिचारिकांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यासंदर्भात अकोला येथे शुक्रवारी समुपदेशन झाले. अकोला विभागात ...
सन २०२१-२२ या वर्षातील सर्वसाधारण सर्व संवर्गातील परिचारिकांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यासंदर्भात अकोला येथे शुक्रवारी समुपदेशन झाले. अकोला विभागात एकूण १३०४ आरोग्य परिचारिकांचे पद आहेत. त्यापैकी ३३७ पदे रिक्त असून १०१७ परिचारिकांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील ५० परिचारिकांचा समावेश आहे. तीन कर्मचाऱ्यांना अवघड व अडगळीच्या ठिकाणी बदली देण्यात आली आहे. यामध्ये मुख्यालयातील परिचारिकांना तालुक्याच्या ठिकाणी तर काहींना पीएचसीत पाठविले आहे. यावर काहींनी हरकत घेतली असता, त्यांचे म्हणणे एकून घेण्यात आले नाही. त्यामुळे अनेकांना याचा फटका बसणार आहे. पाल्यांना शाळेत दाखल केले, त्यांचे शैक्षणिक शुल्क भरले असताना ऐन वेळेवर प्रवेश रद्द केल्यास दुसरीकडे प्रवेश मिळणार का? प्रवेश शुल्क परत मिळणार का? कोरोनामुळे नोकरीच्या ठिकाणी घर भाड्याने मिळणार का, आदी अनेक समस्यांना या परिचारिकांना सामोरे जावे लागत असल्याने ही बदली अमान्य असल्याची माहिती त्यांनी पत्रपरिषदेतून दिली.यावर शासनाने विचार करावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे. यावेळी जिल्हा सरचिटणीस डी.एस. पवार अरुणा सरायकर, विना बागडे, सविता गवई, प्रज्ञा कान्हेकर, कुंदा मानमोडे, ममता चव्हाण, प्रणिता आगलावे, बेबी, जयश्री गणोरकर, कांता वायकुळे उपस्थित होत्या.