मेळघाटातील आरोग्य सेविका विविध मागण्यांसाठी रस्त्यावर
By admin | Published: May 4, 2016 12:32 AM2016-05-04T00:32:29+5:302016-05-04T00:32:29+5:30
मेळघाटात कार्यरत असलेल्या आरोग्य सेविकांना आदिवासी प्रोत्साहन भत्ता (हार्डशिप) मिळत नसल्याने हेल्थ एम्लॉईज फेडरेशनच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेसमोर मंगळवारी बेमुदत धरणे सुरू करण्यात आले आहे.
प्रोत्साहन भत्ता हवा : जिल्हा परिषदेसमोर आंदोलन
अमरावती : मेळघाटात कार्यरत असलेल्या आरोग्य सेविकांना आदिवासी प्रोत्साहन भत्ता (हार्डशिप) मिळत नसल्याने हेल्थ एम्लॉईज फेडरेशनच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेसमोर मंगळवारी बेमुदत धरणे सुरू करण्यात आले आहे.
मेळघाटमध्ये दिवसरात्र आरोग्य सेवा देऊन कृषोषण, मातामृत्यू, बाल मृत्य कमी करण्यासाठी गावोगावी सेवा बजावणाऱ्या आरोग्यसेविका, आरोग्य सहायक महिला, व डॉक्टरांना आदिवासी प्रोत्साहन भत्ता देत असल्यामुळे निवडक आरोग्य सेविकांनाच आदिवासी प्रोत्साहन भत्ता देण्याचे प्रशासनाने ठरविले आहे. याप्रकारामुळे आरोग्य सेविकांमध्ये संताप पसरला आहे. त्यामुळे मेळघाटातील सर्व आरोग्य सेविकांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येत नाही. त्यामुळे हा अन्याय दुर करून सरसकट लाभ देण्यात यावा, बदली प्रक्रियेत ज्यांनी कर्मचाऱ्यांनी आदिवासी भागात सेवा दिली नाही, अशा कर्मचाऱ्यांच्या तातडीने बिगर आदिवासी क्षेत्रातून बदली करावी, मेळघाटतील ज्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या बिगर आदिवासी भागात झाल्या आहेत त्यांना त्वरित कार्यमुक्त करावे आदी मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यामध्ये फेडरेशनचे अध्यक्ष देवेंद्र शिंदे, जियंत औतकर, विनोद डोंगरे, राजेश पणजकर, रजनिकांत श्रीवास्तव, बाबुलाल शिरसाट, राजेंद्र वार्डेकर, अशोक बडोदे, राजू मेश्राम, दुर्गा खंडारे, सुभाष चव्हाण, सुनंदा राऊत, सुनीता उगले, शालिनी गवई, अर्चना तिवारी, गंगा सूर्यवंशी, सुजाता रोडगे, गायत्री साऊरकर, ललिता हरणे, आरोग्य सेविका सहभागी आहेत.