आरोग्य विभागाच्या ‘साईड ब्रँच’ व्हेंटिलेटरवर

By admin | Published: November 23, 2015 12:15 AM2015-11-23T00:15:52+5:302015-11-23T00:15:52+5:30

आरोग्य विभागाच्या साईड बँ्रच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिवताप आणि हत्तीरोग या दोन विभागातील रिक्तपदांची संख्या पाहता ....

On the health side's 'Side Brunch' ventilator | आरोग्य विभागाच्या ‘साईड ब्रँच’ व्हेंटिलेटरवर

आरोग्य विभागाच्या ‘साईड ब्रँच’ व्हेंटिलेटरवर

Next

१७ पदे रिक्त : रुग्णांचे आरोग्य धोक्यात
अमरावती : आरोग्य विभागाच्या साईड बँ्रच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिवताप आणि हत्तीरोग या दोन विभागातील रिक्तपदांची संख्या पाहता आरोग्य विभागाच्या दयनीय परिस्थितीवर शिक्कामोर्तब होते. या विभागातील एकूण १७ पदे रिक्त आहेत.
राज्यात सर्वदूर शासनाद्वारे आरोग्याच्या विविध सुविधा पुरविल्या जातात. या सुविधा पुरविण्यासाठी पदनिर्मिती केली जाते. विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर त्या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी असते. तथापि रिक्त पदांमुळे चांगल्या योजनांची पुरती वाट लागली आहे. आरोग्य विभागातील असंख्य पदे रिक्त असल्याने सामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत.
जिल्ह्यातील हिवताप आणि हत्तीरोग नियंत्रण विभागामध्ये तब्बल १७० पदे रिक्त आहेत. त्यावरुन जिल्ह्यात हिवताप आणि हत्तीरोग नियंत्रणाच्या योजना कितपत यशस्वी होत असतील, हे सांगण्याची गरज नाही. हिवताप अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनसुार जिल्ह्यात हिवताप अधिकारी ते सफाईगार या विविध १७ संवर्गातील मंजूर पदांची संख्या २८१ आहे तर १ सप्टेंबर २०१५ पर्यंत यातील २०५ पदे भरली असून ७६ पदे रिक्त आहेत. यात आरोग्य कर्मचाऱ्यांचा सर्वाधिक अनुशेष आहे. फिल्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पदे भरली न गेल्याने अनेक योजनांचा फज्जा उडाला आहे. कीटकजन्य आजारांच्या या दोन विभागात पदांचा अनुशेष आहे. आरोग्य विभागातील रिक्त पदाचा अनुशेष भरावा, अशी मागणी पीआरसीकडे केली होती.

Web Title: On the health side's 'Side Brunch' ventilator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.