आरोग्य यंत्रणा लागली कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 10:18 PM2017-10-09T22:18:55+5:302017-10-09T22:19:11+5:30

एका खासगी रूग्णालयात डेंग्यूचे महापालिका क्षेत्रात आठ, तर ग्रामीण भागात दोन रूग्ण 'पॉझिटिव्ह' आढळल्याने एकच खळबळ उडाली होती.

The health system started working | आरोग्य यंत्रणा लागली कामाला

आरोग्य यंत्रणा लागली कामाला

Next
ठळक मुद्देझेडपीत डेंग्यू निर्मूलनासाठी बैठक : तालुका आरोग्य अधिकाºयांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : एका खासगी रूग्णालयात डेंग्यूचे महापालिका क्षेत्रात आठ, तर ग्रामीण भागात दोन रूग्ण 'पॉझिटिव्ह' आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. यासंदर्भात जिल्हा आरोग्य आधिकारी व जिल्हा हिवताप अधिकाºयांनी जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकाºयांची सोमवारी झेडपीत बैठक घेतली. डेंग्यू, मलेरिया व चिकनगुनिया आजाराचे निर्मूलन होण्यासाठी प्रभावी उपाययोजना आखण्याविषयी महत्त्वपूर्ण चर्चा करून त्वरित दखल घेण्याच्या सूचना उपस्थित डॉक्टरांना देण्यात आल्या.
ग्रामीण भागात ज्या परिसरात डेंग्यूचे रूग्ण आढळले, तेथे अनेक नागरिकांचे रक्तजल नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. डेंग्यूचे १० रूग्ण पॉझिटिव्ह आढळल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित करताच जिल्ह्यात खळबळ उडाली होती. त्यामुळे शासकीय आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे.
महापालिकेतही आमदार सुनील देशमुख यांनीही डेंग्यूचा आढावा घेतला होता. तालुका पातळीवर सर्व वैद्यकीय अधिकाºयांनी कीटकशास्त्रीय अधिकाºयांच्या माध्यमातून डेंग्यूचे रूग्ण ज्या भागात आढळले किंवा संशयित वाटतात त्या भागात टेलिफॉस द्रव्य सोडणे, गप्पी मासे साडणे व डासांचा प्रादुर्भाव जेथे वाढला असेल त्याठिकाणी फॉगिंग मशिनच्या वापर करणे व कोरडा दिवस पाळणे अशा सूचना डीएचओ सुरेश असोले व जिल्हा हिवताप अधिकारी सुरेश तरोडेकर यांनी बैठकीत तालुका आरोग्य अधिकाºयांना सूचना दिल्या.
दर्यापूर व अंजनगाव बारी या ठिकाणी प्रत्येकी एक डेंग्यूचा रूग्ण खासगी रूग्णालयात खासगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालानुसार पॉझिटिव्ह आढळून आला. त्या भागात जाऊन तालुका आरोग्य प्रशासनाने नागरिकांच्या रक्तांचे नमुने घेतले आहे. व ते नमुने तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेत पाठविले. ग्रामीण भागात असे रूग्ण आढळल्यास त्वरित दखल घ्या, हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा दमही जिल्हा आरोग्य अधिकाºयांनी तालुका आरोग्य आधिकाºयांना भरला. त्यामुळे मंगळवारपासून आरोग्य यंत्रणा खºया अर्थाने कामाला लागणार असल्याचे सांगण्यात आले.

ग्रामीण भागात यंत्रणा कामाला लागली आहे. ज्या परिसरात रूग्ण आढळून आले आहेत. तेथील रक्तजल नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कोरडा दिवस पाळणे, पाण्यात गप्पी मासे सोडणे, टेलिफॉस द्रव्याचा वापर करण्याच्या सूचना कीटकशास्त्र अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत.
- सुरेश तरोडेकर, जिल्हा हिवताप अधिकारी, अमरावती

Web Title: The health system started working

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.