आरोग्यसेवकाने प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात लावला गळफास; सुसाईड नोट पोलिसांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2022 03:35 PM2022-05-10T15:35:39+5:302022-05-10T15:53:10+5:30

उमेश दिघाडे हे गेल्या ९ वर्षांपासून मालखेड प्राथमिक उपआरोग्य केंद्रात कार्यरत होते. ड्यूटीवर असताना त्यांनी रात्री ८ वाजेच्या सुमारास उपकेंद्रातील हॉलमध्ये सिलिंग फॅनला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.

health worker commits suicide at primary health sub-center Malkhed, suicide note found | आरोग्यसेवकाने प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात लावला गळफास; सुसाईड नोट पोलिसांच्या हाती

आरोग्यसेवकाने प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात लावला गळफास; सुसाईड नोट पोलिसांच्या हाती

googlenewsNext
ठळक मुद्देउपकेंद्रातील हॉलमध्ये सिलींग फॅनला लावला गळफास

चांदूर रेल्वे (अमरावती) : तालुक्यातील मालखेड येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातच एका आरोग्यसेवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता.९) रात्री ८ वाजता घडली. उमेश पंजाबराव दिघाडे (४५), रा. कमिश्नर कॉलनी, अमरावती, असे मृतक आरोग्यसेवकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, उमेश दिघाडे हे गेल्या ९ वर्षांपासून मालखेड प्राथमिक उपआरोग्य केंद्रात कार्यरत होते. ड्यूटीवर असताना त्यांनी रात्री ८ वाजेच्या सुमारास उपकेंद्रातील हॉलमध्ये सिलिंग फॅनला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनचे पीएसआय विलास धोंडे, पोलीस कर्मचारी प्रवीण मेश्राम, मनोज वानखडे, चालक जगदीश राठोड हे घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला होता. मृतकामागे पत्नी व मुलगी, असा परिवार आहे.

घटनास्थळी सुसाइड नोट आढळली असून, एका आजाराने सदर मृतक त्रस्त असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. पुढील तपास ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनात चांदूर रेल्वे पोलीस करीत आहेत. आजाराला कंटाळून आत्महत्या केली असल्याची माहिती प्राथमिक अहलातून मिळाली असून, मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे.

Web Title: health worker commits suicide at primary health sub-center Malkhed, suicide note found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.