आरोग्य कर्मचाऱ्यांना दोन महिन्यापासून वेतनाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:09 AM2021-06-11T04:09:51+5:302021-06-11T04:09:51+5:30
अमरावती : कोरोनाकाळात आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा देत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना एप्रिल तसेच मे अशा दोन महिन्यांच्या ...
अमरावती : कोरोनाकाळात आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा देत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना एप्रिल तसेच मे अशा दोन महिन्यांच्या वेतनासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे गुरुवारपासून आरोग्य कर्मचाऱ्यांनी काळया फिती लावून सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत हेल्थ एम्प्लाइज फेडरेशनचे अध्यक्ष देवेंद्र शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सर्व संवर्गातील आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या लढ्यात सहभागी झाले आहेत. मात्र, दोन वर्षांपासून कधीच त्यांना वेळेवर वेतन मिळाले नाही. कर्मचाऱ्यांचे वेतन बिले उशिराने कोषागार कार्यालयात टाकण्यात येतात. म्हणून दर महिन्याला १५ ते २५ तारखेला वेतन मिळत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची वेतन नियमितपणे देण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा देवेंद्र शिंदे, विनोद डोंगरे, रजनीकांत श्रीवास्तव, अशोक पोकळे, बाबूलाल शिरसाट, सुभाष चव्हाण, विनोद पारधी, अशोक नांदुरकर व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.