मेळघाटातील आरोग्य कर्मचारी तीन महिन्यांपासून वेतनाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 05:00 AM2020-09-24T05:00:00+5:302020-09-24T05:00:13+5:30

मेळघाटात जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागात आरोग्य सेवक, सेविका, आरोग्य सहायक, सहायिका, विस्तार अधिकाऱ्यांसह इतरही कर्मचारी कुपोषण बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठी गावपातळीवर कोरोनाकाळातही नियमित सेवा देत आहेत.

Health workers in Melghat have been without pay for three months | मेळघाटातील आरोग्य कर्मचारी तीन महिन्यांपासून वेतनाविना

मेळघाटातील आरोग्य कर्मचारी तीन महिन्यांपासून वेतनाविना

Next
ठळक मुद्देराज्यशासनाकडून अनुदान नाही : लेखाशीर्ष विभागाची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : मेळघाटातील अतिदुर्गम क्षेत्रात आरोग्यसेवा देणारे बहुसंख्य कर्मचारी तीन महिन्यांपासून वेतनाविना आहेत. आर्थिक विवंचनेमुळे आरोग्यसेवा सोडण्याच्या मानसिकतेत असल्याच्या प्रतिक्रिया काही कर्मचाऱ्यांनी दिल्या
मेळघाटात जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागात आरोग्य सेवक, सेविका, आरोग्य सहायक, सहायिका, विस्तार अधिकाऱ्यांसह इतरही कर्मचारी कुपोषण बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठी गावपातळीवर कोरोनाकाळातही नियमित सेवा देत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेतील लेखा विभागाला विचारणा केली असता, त्यांच्या वेतनाच्या लेखाशीर्ष क्र. ०६२१ वर राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त नसल्याची माहिती मिळाली. राज्य शासनाने तीन महिन्यांचे वेतन अदा न केल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाकाळातही नागरिकांच्या सेवेत झटणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांबाबत जिल्हा परिषदेच्या सीईओंनी तातडीने दिलासादायक निर्णय घ्यावा, अशी मागणी सर्व स्तरांतून करण्यात येत आहे.

दसरा, दिवाळी सण कसा साजरा करणार?
राज्य शासनाकडून जिल्हा परिषद प्रशासनाला आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरिता अनुदान दिले जाते. ते अनुदान जिल्हा परिषद वित्त व लेखा विभागाच्या अभिकरण लेखाशीर्षमधील उपलेखाशीर्ष क्रमांक ०६२१ वर जमा केले जाते. त्यांतर जिल्हा कोषागार कार्यालयाकडे वेतनाची रक्कम वर्ग करून कर्मचारी वेतन देयकानुसार कोषागार कार्यालयाकडून कॅश मॅनेजमेंट सर्व्हिसद्वारे कर्मचाऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाते. तीन महिन्यांपासून ०६२१ या लेखाशीर्षवर राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त झाले नाही. त्यामुळे आरोग्य कर्मचाºयांना आर्थिक पेच पडला आहे.

हेल्थ एम्प्लॉईज फेडरेशन पुकारणार संप
हेल्थ एम्पलाईज फेडरेशन या जिल्हा पातळीवरील संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र शिंदे व पदाधिकाऱ्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने संपाचा इशारा देणारे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांना दिले. त्यावर सीईओ काय निर्णय घेतात, याकडे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.

Web Title: Health workers in Melghat have been without pay for three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर