नवनीत राणांच्या जातवैधतेवर १ ऑक्टोबरला सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:14 AM2021-09-03T04:14:15+5:302021-09-03T04:14:15+5:30

अमरावती : खासदार नवनीत राणा यांच्या जातवैधता प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात आता १ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ...

Hearing on caste validity of Navneet Rana on 1st October | नवनीत राणांच्या जातवैधतेवर १ ऑक्टोबरला सुनावणी

नवनीत राणांच्या जातवैधतेवर १ ऑक्टोबरला सुनावणी

Next

अमरावती : खासदार नवनीत राणा यांच्या जातवैधता प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात आता १ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ऑफलाईन कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर बुधवारी खा. राणा यांच्याविरोधात याचिका पटलावर आली. मात्र, सुनावणीसाठी पुढील तारीख देण्यात आली. नवनीत राणा यांचे जातवैधता प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविले होते. त्या निर्णयाला नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांच्या आव्हान याचिकेच्या निर्णयाकडे माजी खासदार आनंद अडसूळ यांच्यासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सन २०१४ मध्ये नवनीत राणा यांनी अमरावती लोकसभा या अनुसुचित जातीसाठी राखीव मतदारसंघातून निवडणूक लढविली होती, त्यावेळी तत्कालीन खासदार आनंद अडसूळ यांनी त्यांच्या जातवैधतेला आव्हान दिले होते. त्या जात प्रमाणपत्राच्या आधारे राणा या २०१९ साली अमरावती मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. त्यामुळे खासदार राणा यांच्या जातवैधतेच्या निर्णयाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Hearing on caste validity of Navneet Rana on 1st October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.