शहरात डोळ्यांच्या साथीने मुले हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 11:21 PM2019-07-01T23:21:39+5:302019-07-01T23:22:12+5:30

जेमतेम पावसाची सुरुवात झाली असतानाच शहरात डोळ्यांच्या आजारांनी डोके वर काढले आहे. या आजारांनी मुले त्रस्त असून, सध्या प्रत्येक डोळ्याच्या रुग्णालयात मोठी गर्दी दिसून येत आहे.

Hearing children with eyes in the city | शहरात डोळ्यांच्या साथीने मुले हैराण

शहरात डोळ्यांच्या साथीने मुले हैराण

Next
ठळक मुद्देशासकीय रुग्णालये फुल्ल

इंदल चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जेमतेम पावसाची सुरुवात झाली असतानाच शहरात डोळ्यांच्या आजारांनी डोके वर काढले आहे. या आजारांनी मुले त्रस्त असून, सध्या प्रत्येक डोळ्याच्या रुग्णालयात मोठी गर्दी दिसून येत आहे.
आठवडाभरापासून कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने संसर्गजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. यामध्ये डोळ्याचा आजार प्रामुख्याने जाणवत आहे. महापालिका हद्दीत शासकीय व खासगी मिळून २५ डोळ्यांची रुग्णालये आहेत. प्रत्येक रुग्णालयात १० पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. डोळ्यांचा भाग नाजूक असल्याने घरगुती उपचारावर भर न देता तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने उपचार घेण्याचे आवाहन जिल्हा सामान्य रुग्णालयातील चिकित्सक डॉ. नम्रता सोनोने यांनी केले आहे.
लक्षणे
डोळा लालसर होणे, आत टोचल्यासमान वेदना होणे, चिपड येणे, बाहेर फिरताना साधारण हवेचा त्रास जाणवणे आदी डोळे येण्याची लक्षणे आहेत.
उपाययोजना
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने धुळीसह घाण पाण्याला अप्रत्यक्ष स्पर्श होतो. त्यामुळे कुठल्याही वस्तू हाताळताना हात स्वच्छ धुवून घ्यावे. डोळ्यांजवळील भागावर हलक्या हाताने कोरड्या कपड्याने पुसून काढावे. पुन्हा-पुन्हा तोच रुमाल वापरल्यास त्याचे इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता आहे. शक्यतोवर टिश्यू पेपरचा वापर करावा. घाण पाण्याचा हात डोळ्यांना लागल्यास व्हायरल इन्फेक्शन होऊन डोळ्यांचा आजार होऊ शकतो.
डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या उपचार
डोळे हे शरीराचे अत्यंत नाजूक अवयव असल्याने त्यासंबंधी कुठलाही त्रास जाणवल्यास घरगुती उपचार न घेता डॉक्टरांकडे तपासणी करूनच योग्य उपचार घ्यावा. ग्रामीण भागात बहुतांश नागरिक दुकानातील निंबोळीचा वापर करतात. मात्र, हा उपचार तात्पुरता आहे. केवळ निंबोळीनेच आजार पूर्णपणे बरा होणार नाही. डोळ्याचा प्रत्येक आजार निंबोळीनेच बरा होऊ शकत नाही. त्याचे इन्फेक्शन झाल्यास धोका उद्भवू शकतो, असे नेत्रतज्ज्ञ पंकज लांडे म्हणाले.

Web Title: Hearing children with eyes in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.